पावसाची विश्रांती,परंतु घाटमाथ्यावर धोका कायम
पुणे शहरात कालपासून पावसात काहीशी विश्रांती दिसली असली, तरी जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आजही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील 24 तासांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात अनुक्रमे 60 मिमी पावसाची नोंद झाली. कमाल तापमान 32.4 अंश सेल्सिअस तर पुढील 24 तासांसाठी अंदाजित तापमान 32 अंश इतके राहील.
घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा
सातारा जिल्ह्यातील तापमान 29.3 अंश सेल्सिअस वर नोंदवले गेले असून मागील 24 तासांत 31 मिमी पाऊस झाला आहे. पुढील काळात घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सामान्य भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे.
घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज
कोल्हापूर शहरात मागील 24 तासांत 5 मिमी पाऊस झाला असला, तरी गगनबावडा व आजरा भागात 30 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजही कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शहरात हलक्या सरींचा अनुभव येण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्हा – वाऱ्याचा वेग आणि एकदोन मुसळधार सरी
सांगलीत काल 5 मिमी पाऊस झाला असून आज सोसाट्याच्या वाऱ्यासह एक-दोन वेळा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जिल्ह्यातील कमाल तापमान 31 अंश आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्हा – ढगाळ वातावरण आणि हलकासा पाऊस
सोलापूरमध्ये तापमानाने चढ-उतार पाहायला मिळत असून आजचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील.जिल्ह्यासाठी कोणताही विशेष अलर्ट नसला, तरी काही भागात ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
चक्राकार वाऱ्यांमुळे पावसाचा जोर कायम
दक्षिण मध्य महाराष्ट्रात, समुद्र सपाटीपासून 7.6 किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर टिकून आहे. हवामान विभागाने घाटमाथ्यालगत राहणाऱ्या नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Mumbai,Maharashtra
June 16, 2025 8:57 AM IST
शेतकऱ्यांनो काळजी घ्या! वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस पडणार, या जिल्ह्यांना IMD कडून ऑरेंज अलर्ट जाहीर