1) चुकीचा किंवा बनावट 7/12 उतारा
शेतजमिनीच्या मालकीचे प्रमाणपत्र म्हणजे 7/12 उतारा (सातबारा). जर हा उतारा चुकीच्या माहितीवर आधारित असेल, बनावट दस्तऐवज वापरून तयार केला गेला असेल किंवा वारसांचे योग्य नोंदणी न करता घेतला गेला असेल, तर तो बेकायदेशीर ठरतो. यामुळे मालकी हक्क नाकारला जाऊ शकतो.
2) वारसांची योग्य नोंद न करणे
मालमत्तेच्या हस्तांतरानंतर, विशेषतः एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याचे वारस शेतजमिनीत नोंदवले गेले नाहीत, तर इतर कोणताही हक्कदार उभा राहू शकतो. यामुळे मूळ मालकाचा हक्क प्रश्नचिन्हात येतो आणि जमीन बेकायदेशीररित्या वापरण्यात येते.
3) शेतजमिनीत अनधिकृत बांधकाम करणे
शेतजमिनीवर अनधिकृतरीत्या घर, गोडाऊन, व्यवसायिक इमारतीचे बांधकाम केल्यास ती जमीन कायद्यानुसार शहरी मालमत्ता मानली जाऊ शकते. तसेच, शेतजमिनीच्या मूळ वापरात बदल करून वापरणे म्हणजे जमीन महसूल कायद्याचे उल्लंघन, त्यामुळे मालकीवर गदा येऊ शकते.
4) बोगस वडिलोपार्जित हक्क दाखवणे
काही वेळा जमीन हडपण्यासाठी लोक बनावट वडिलोपार्जित हक्काचे दस्तऐवज तयार करतात. मात्र महसूल विभाग किंवा न्यायालयात याचा तपशील पडताळण्यात आल्यास, अशा खोट्या हक्कादाव्यांवरून जमीन जप्त होऊ शकते व बेकायदेशीर मालकी म्हणून घोषित केली जाऊ शकते.
5) एनए (Non-Agricultural) परवानगीशिवाय वापर बदलणे
शेतजमिनीचा गावठाण, इंडस्ट्रियल किंवा रेसिडेन्शियल उपयोगासाठी वापर करण्यासाठी एनए (नॉन अॅग्रीकल्चरल) परवानगी आवश्यक असते. परंतु अनेकवेळा ही परवानगी न घेता जमीन वापर बदलला जातो, जे MRTP कायदा व इतर कायद्यांचे उल्लंघन ठरते. त्यामुळे मालकीवर कायदेशीर गंडांतर येऊ शकते.
शेतजमिनीवरचा हक्क फक्त नावात नाही, तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावरच तो वैध ठरतो. 7/12 उतारा, वारस नोंदणी, वापरपरिवर्तन, आणि बांधकाम याबाबत योग्य ती दक्षता घेतली नाही, तर जमीन बेकायदेशीर ठरू शकते आणि ती सरकारद्वारे ताब्यात घेतली जाऊ शकते.
Mumbai,Maharashtra
June 02, 2025 5:29 PM IST
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! हे 5 कारणे तुमची शेतजमीन ठरवणार बेकायदेशीर