1) मोबाईल नंबर अपडेट
आता शेतकरी पोर्टलवरून स्वतःचा मोबाईल नंबर अपडेट करू शकणार.
‘Update Mobile Number’ या पर्यायावर क्लिक करा. आधार क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून, आधारशी लिंक असलेला नवीन मोबाईल नंबर नोंदवा.
2) ऑनलाइन परतावा
जर कोणी शेतकरी अपात्र असूनही योजना अंतर्गत पैसे घेत असतील, तर आता ऑनलाइन पैसे परत करता येणार आहेत.’Refund’ या पर्यायावर क्लिक करून, आधार क्रमांक टाकून रक्कम परत करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल.
3) स्वेच्छेने लाभ सोडण्याचा पर्याय
कोणत्याही कारणामुळे तुम्हाला योजना अंतर्गत पैसा नको असेल, तर Voluntary Surrender of PM-KISAN Benefits पर्याय वापरून हा लाभ सोडता येणार आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकून, संमती (consent) द्या, ओटीपीद्वारे पुष्टी करा आणि प्रक्रिया पूर्ण करा.
4) चुकीने लाभ सोडल्यास पुन्हा योजना सुरू करा
जर चुकून ‘Voluntary Surrender’ केला असेल, तर आता तुम्ही पुन्हा योजनेंतर्गत लाभार्थी होऊ शकता. ‘Voluntary Surrender Revocation’ वर क्लिक करा. आधार किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून पुन्हा नोंदणी करा.
5) राज्य किंवा जिल्हा बदलता येणार
‘State Transfer Request’ या पर्यायामुळे ज्यांचा पत्ता चुकीचा नोंदवला गेला आहे, अशा अपात्र लाभार्थ्यांना आपला पत्ता दुरुस्त करता येणार आहे. ही प्रक्रिया फक्त शेतजमिनीतून योग्य लाभार्थी असल्याचे दस्तऐवज (जसे 7/12 उतारा) अपलोड केल्यानंतरच पूर्ण होईल. जर चालू तिमाहीचे पैसे प्रक्रियेत असतील, तर पत्ता बदलाची प्रक्रिया त्या रकमेच्या वितरणानंतर होईल.
6) हेल्पडेस्क पर्याय
जर तुमचा हप्ता अडवला गेला असेल, किंवा कोणताही तांत्रिक अडथळा असेल, तर Helpdesk Query Form भरून तुम्ही पोर्टलवरून तक्रार नोंदवू शकता.
Mumbai,Maharashtra
June 10, 2025 1:45 PM IST