जमीन प्रकार
1) भोगवटादार वर्ग-1 जमीन
शेतकरीच जमिनीचा मालक असतो. कोणत्याही अटीशिवाय मुक्त विक्री करता येते.
2. भोगवटादार वर्ग-2 जमीन
ही जमीन शासनाच्या परवानगीशिवाय विकता किंवा हस्तांतरित करता येत नाही. ती नियंत्रित किंवा प्रतिबंधित जमिनींच्या श्रेणीत येते.
3. शासकीय पट्टेदार जमीन
शासनाची मालकीची असून 10, 30, 50 किंवा 99 वर्षांसाठी भाडेपट्ट्यावर दिली जाते.
4. महाराष्ट्र शासनाची जमीन
पूर्णतः शासकीय मालकीची असते. कोणालाही मालकी हस्तांतर करता येत नाही.
भोगवटादार वर्ग-2 जमिनीचे 16 प्रमुख प्रकार
महाराष्ट्र शासनाच्या 17 मार्च 2012 आणि 15 मार्च 2021 च्या निर्णयानुसार, खालील 16 प्रकारच्या जमिनी वर्ग-2 मध्ये समाविष्ट आहेत. यांचा उल्लेख गाव नमुना 1 क मध्ये केला जातो.
मुंबई कुळ कायद्याखाली विकलेली जमीन1 क (1)
इनाम व वतन जमिनी (देवस्थान वगळता)1 क (2)
शेतमजूर, भूमीहीन यांना दिलेल्या योजना जमिनी1 क (3)
सामाजिक संस्थांना दिलेल्या योजना जमिनी1 क (4)
सिलिंग अधिनियमाखालील वाटप जमिनी1 क (5)
महानगर/नगरपालिकेच्या आराखड्यातील जमिनी1 क (6)
देवस्थान इनाम जमिनी1 क (7)
आदिवासी खातेदारांची जमीन (कलम 36 अ)1 क (8)
पुनर्वसन अंतर्गत दिलेली जमीन1 क (9)
भाडेपट्टा तत्वावरील जमीन1 क (10)
भूदान/ग्रामदान जमिनी1 क (11)
चौकशी प्रलंबित खासगी वने / सिलिंग जमिनी1 क (12)
भूमीधारी हक्कातून मिळालेली जमीन1 क (13)
कमाल मर्यादेच्या सूटदार जमिनी1 क (14)
भूसंपादनातून मिळालेली जमीन1 क (15)
वक्फ जमिनी1 क (16)
कुठल्या जमिनी वर्ग-1 मध्ये रूपांतर करता येत नाही?
खालील प्रकारांच्या जमिनींचे भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतर शक्य नाही.
सिलिंग अधिनियमांतर्गत वाटप झालेल्या जमिनी
महानगर / नगरपालिकेच्या विकास आराखड्यातील शासकीय जमिनी
देवस्थान इनाम जमिनी
आदिवासी खातेदारांची जमीन (कलम 36 अ)
चौकशी प्रलंबित खासगी वने
कमाल मर्यादेच्या सूटदार जमिनी
भूसंपादनातून मिळालेल्या जमिनी
वक्फ जमिनी
Mumbai,Maharashtra
May 31, 2025 12:52 PM IST