मान्सूनची सुरुवात आणि स्थिती
सध्या मान्सूनने अंदमान आणि निकोबार बेटे, दक्षिण अंदमान समुद्र आणि पूर्व बंगाल उपसागराच्या काही भागांमध्ये प्रवेश केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 15-16 मे पर्यंत मान्सून वेगाने पुढे सरकणार असून त्यानंतर तो दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश करेल आणि श्रीलंकेचा काही भाग, दक्षिण बंगाल उपसागराचा भाग आणि संपूर्ण अंदमान बेटे व्यापेल.
महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस
14 मे पर्यंत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे राज्यात उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असून जमिनीची आर्द्रता वाढेल. हे वातावरण खरीप हंगामातील लागवडीसाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे.
खरीप हंगामावर होणारा सकारात्मक परिणाम
लवकर सुरू होणारा मान्सून म्हणजेच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. भारतातील शेती व्यवस्था प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्याने खरीप हंगामाच्या सुरुवातीसच पुरेसा पाऊस मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते.
खरीप हंगामात भात, सोयाबीन, मका, उडीद, मूग, तूर, बाजरी, भुईमूग आणि कापूस यांसारखी पिके घेतली जातात. मान्सून वेळेवर आणि पुरेसा असल्यास यातील पिकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता वाढते. यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि बाजारपेठेवरही सकारात्मक परिणाम होतो.
मान्सून आगमनाचे संभाव्य वेळापत्रक
15 मे – अंदमान आणि निकोबार बेटे
27 मे – केरळ
1 जून – तामिळनाडू, लक्षद्वीप, आसाम, मेघालय
5 जून – गोवा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, कर्नाटक, पश्चिम बंगाल
6 जून – महाराष्ट्र (आंतरिक भाग), आंध्र प्रदेशचे इतर जिल्हे
10 जून – मुंबई, मध्य महाराष्ट्र, तेलंगाणा, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार
15 जून – गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश
20 जून – राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली
25 जून – हरियाणा, उत्तर प्रदेश
30 जून – दिल्ली, राजस्थान
दरम्यान, लवकर दाखल होणारा मान्सून हा शेती, जलस्रोत व्यवस्थापन आणि ऊर्जानिर्मिती यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी हे हवामान अतिशय योग्य असून, शेतकऱ्यांनी बियाणे व खतांच्या तयारीस सुरुवात करावी.
Mumbai,Maharashtra
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! या तारखेला महाराष्ट्रात मान्सून घडकणार, वाचा अंदाजित वेळापत्रक