हा कायदा शेतकऱ्याला केवळ जमीन कसण्याचा नाही, तर पुढे मालकी हक्क मिळवण्याचा अधिकार देखील प्रदान करतो. कायद्याचा मूळ उद्देश म्हणजे जे शेतकरी अनेक वर्षांपासून इतरांच्या जमिनीवर भाडे तत्वावर शेती करत आहेत, त्यांना त्यांच्या श्रमांचा पूर्ण न्याय मिळावा.
वर्ग-२ जमिनीचं वर्ग-१ मध्ये रूपांतर काय आहे प्रक्रिया?
शेतकऱ्याला जमिनीचा पूर्ण कायदेशीर हक्क मिळावा यासाठी वर्ग-२ जमिनीचं वर्ग-१ मध्ये रूपांतर आवश्यक आहे. यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया पार पाडावी लागते:
अर्ज सादर – संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो.
जमिनीची पाहणी – तलाठी आणि मंडळ अधिकारी प्रत्यक्ष शेतजमिनीची तपासणी करून अहवाल तयार करतात.
सार्वजनिक नोटीस – तहसीलदार कार्यालयाकडून एक महिन्याची नोटीस प्रसिद्ध होते, जिच्या माध्यमातून इतर कोणताही आक्षेप नोंदवता येतो.
नोंदणी प्रक्रिया – कोणताही आक्षेप न आल्यास, सातबाऱ्यावर जमिनीची नोंद वर्ग-१ म्हणून केली जाते.
जमीन रूपांतरणासाठी लागणारी कागदपत्रे
रूपांतरण प्रक्रियेसाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते:
1960 पासूनचा सातबारा उतारा
फेरफार नोंदी
खसरा पत्रक
कुळ प्रमाणपत्र
रूपांतरण शुल्क भरल्याचा चलन दस्तऐवज
सर्व कागदपत्रे पूर्ण आणि अहवाल सकारात्मक असल्यास, रूपांतरण सहजतेने पार पाडले जाते.
शेतकऱ्यांना काय फायदे मिळतात?
वर्ग-१ जमिनीचा दर्जा मिळाल्यानंतर शेतकऱ्याला पुढील फायदे होतात: जसे की,
बँकेकडून शेतीसाठी कर्ज मिळवणे सोपे होते.
सरकारी योजनांचा लाभ घेण्याची पात्रता मिळते.
जमिनीच्या विक्री, भाडेपट्टी व्यवहारात अडथळे येत नाहीत.
वारस नोंदणी आणि कायदेशीर स्पष्टता येते.
फसवणुकीपासून संरक्षण मिळते.
Mumbai,Maharashtra
May 15, 2025 11:45 AM IST
जमीन वर्ग -2 चे रूपांतर वर्ग-1 मध्ये करण्याचे नियम काय आहेत? जाणून घ्या सविस्तर