By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Farmer Success Story : आले पिकात सूर्यफुलाचे आंतरपीक, शेतकऱ्याचा प्रयोग ठरला यशस्वी, मिळालं 1 लाख रुपये उत्पन्न
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Farmer Success Story : आले पिकात सूर्यफुलाचे आंतरपीक, शेतकऱ्याचा प्रयोग ठरला यशस्वी, मिळालं 1 लाख रुपये उत्पन्न
टॉप स्टोरीज़

Farmer Success Story : आले पिकात सूर्यफुलाचे आंतरपीक, शेतकऱ्याचा प्रयोग ठरला यशस्वी, मिळालं 1 लाख रुपये उत्पन्न

News Desk
Last updated: 2025/05/16 at 5:07 AM
News Desk
Share
3 Min Read

Contents
आलेपिकात आंतरपीक म्हणून सूर्यफुल लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. सांगलीचे शेतकरी राजेंद्र मोहिते यांनी अभिनव प्रयोग केला आहे. Farmer Success Story : आले पिकात सूर्यफुलाचे आंतरपीक, शेतकऱ्याचा प्रयोग ठरला यशस्वी, मिळालं 1 लाख रुपये उत्पन्न

Last Updated:May 16, 2025 9:45 AM IST

आलेपिकात आंतरपीक म्हणून सूर्यफुल लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. सांगलीचे शेतकरी राजेंद्र मोहिते यांनी अभिनव प्रयोग केला आहे.

X

Farmer Success Story : आले पिकात सूर्यफुलाचे आंतरपीक, शेतकऱ्याचा प्रयोग ठरला यशस्वी, मिळालं 1 लाख रुपये उत्पन्न

सांगली: आले पिकात आंतरपीक म्हणून सूर्यफूल लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वांगी गावचे प्रगतशील शेतकरी राजेंद्र मोहिते यांनी अभिनव प्रयोग केला होता. उन्हाळ्याच्या दिवसात आले पिकाला असलेली सावलीची गरज म्हणून आंतरपीक घ्यावे लागते. आंतर पिकाची निवड करताना त्यांनी मित्राच्या सल्ल्याने लोकप्रिय आंतरपीक म्हणून प्रसिद्ध असलेल्या सूर्यफूल पिकाची निवड केली. विशेष म्हणजे आल्यात सूर्यफूल आंतरपीक घेण्याचा हा पहिलाच प्रयोग होता.

एक एकर आल्याच्या पिकामध्ये केलेल्या या अभिनव प्रयोगातून मोहिते यांना 100 दिवसात एक लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. आल्याच्या खतावर सूर्यफूल वाढले. यासाठी वेगळी एकही रुपयाची खते किंवा औषधे फवारली नाहीत. दीड फुटाच्या अंतरावर बिया टोकून घेतल्या आणि सहा वेळा भुईपाटाने पाणी दिले, असं प्रयोगशील शेतकरी राजेंद्र मोहिते म्हणाले.

रब्बी हंगाम पोषक

प्रयोगशील शेतकरी मोहिते यांनी गंगा-कावेरी या संकरित सूर्यफूल वाणाची लागवड केली होती. त्यांच्या अनुभवानुसार हे वाण खरीप पेक्षा रब्बी हंगामात उत्तम पिकते. गंगा-कावेरी फुलण्यासाठी रब्बीतील हवामान पोषक असून या दिवसात रोग, किडीचा कमी प्रादुर्भाव यामुळे उत्पादनाचा उतारा चांगला मिळतो.

पोपटांचा उपद्रव

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सूर्यफुलाची लागवड केली होती. मार्च महिन्यामध्ये बिया भरू लागताच पोपटांचे थवे शेतामध्ये येऊ लागले. पोपटांपासून सूर्यफूल वाचवण्यासाठी त्यांनी प्रत्येक सूर्यफुलास प्लास्टिकच्या पिशव्या बांधल्या होत्या. परंतु दुसऱ्याच दिवशी उष्णतेने पिशव्यांना पाणी सुटल्याचे लक्षात येताच त्यांनी सर्व पिशव्या सोडून टाकल्या. राखण करण्याच्या पारंपरिक पद्धतीनेच सूर्यफूल पोपटांपासून वाचवल्याचे मोहिते सांगतात.

दुहेरी फायदा

उत्तम प्रतीच्या शेतजमिनीमध्ये आले पिकासाठी मशागत झाल्याने सूर्यफुलाचे पीक जोमदार फुलले. दुय्यम पीक म्हणून फुलत असताना सूर्यफुलाच्या मोठ्या जाड पानांनी मुख्य पीक असलेल्या आल्यावरती सावलीचे आच्छादन घातले. यामुळे कडक उन्हाळ्यात आल्याचे संरक्षण झाले. शिवाय ऊस पट्ट्यामध्ये अत्यंत दुर्मिळ होत चाललेले सूर्यफूल देखील फुलले.

मोहिते यांना एक एकर आंतरपीक प्रयोगातून 10 क्विंटल सूर्यफूल मिळाल्याने सध्याच्या बाजारभावाप्रमाणे त्यांना 1 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले. मुख्य पीक असलेल्या आल्याचे बाजारभाव यंदा कोसळले आहेत. यामुळे आंतरपिकातून मिळालेल्या समाधानकारक नफ्यामुळे दिलासा मिळाल्याचे प्रयोगशील शेतकरी राजेंद्र मोहिते यांनी सांगितले.

Location :

Sangli,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

Farmer Success Story : आले पिकात सूर्यफुलाचे आंतरपीक, शेतकऱ्याचा प्रयोग ठरला यशस्वी, मिळालं 1 लाख रुपये उत्पन्न

TAGGED: agriculture, how to farm sunflowers, Sangli, success story, Sunflower, sunflower farming, sunflower farming information, कृषी, सांगली, सूर्यफूल, सूर्यफूल शेती, सूर्यफूल शेती कशी करतात, सूर्यफूल शेती माहिती
Previous Article मेक्सिकोमध्ये टाटा ऑटोकॉम्प आणि कॅटकॉनचा नवीन संयुक्त उपक्रम एकत्रितपणे एकत्रित सामग्री तयार करण्यासाठी – टाटा ऑटोकॉम्प आणि कॅटकन्स मेक्सिकोमधील नवीन संयुक्त उपक्रम एकत्रित सामग्री टोगेथर बनवेल
Next Article Poultry Farming: कोंबड्यांना AC सारखी गार गार हवा, शेतकऱ्यानं बनवलं अनोखे जुगाड, Video
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

सरकार विमा कंपन्यांचा वाटा कमी करेल, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्समधील हिस्सा विकण्याची तयारी करेल आणि जीआयसी रे – सरकार विमा कंपन्यांमधील वाटा कमी करेल
Business June 25, 2025
शिक्षण बारावी पास, शेतकऱ्यानं निवडला डाळिंब शेतीचा मार्ग, 6 लाखांचे उत्पन्न!
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
आर्थिक चिंता असूनही, वाढीची गती कायम आहेः इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी – आर्थिक चिंता असूनही वाढीची गती अखंड इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी
Business June 25, 2025
जीएसीएम तंत्रज्ञान: जीएसीएम तंत्रज्ञानाने व्हीएक्सएल एज्युकेटमध्ये 30 % भागभांडवल प्राप्त केले- जीएसीएम तंत्रज्ञान व्हीएक्सएल शिक्षणात 30 टक्के हिस्सा आहे
Business June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?