योजनेचा उद्देश आणि कार्यपद्धती
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना केंद्र सरकारने लघु व सीमांत शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी सुरू केली आहे. योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते, जे तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांचे हप्ते थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल, पारदर्शक व DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे राबवली जाते.
पात्रतेचे निकष
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटींचे पालन आवश्यक आहे जसे की,
शेतजमीन असणे आवश्यक: अर्जदाराच्या नावावर शेतीयोग्य जमीन असावी.
संस्थात्मक मालकी अपात्र: जर जमीन ट्रस्ट, कंपनी किंवा अन्य संस्थेच्या नावावर असेल, तर लाभ मिळणार नाही.
सरकारी कर्मचारी अपात्र: केंद्र व राज्य सरकारचे गट अ व ब दर्जाचे नोकरदार या योजनेसाठी पात्र नाहीत. मात्र, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) यांना वगळ देण्यात आलेली आहे.
व्यावसायिक अपात्र: नोंदणीकृत डॉक्टर, वकील, अभियंते, चार्टर्ड अकाउंटंट्स इत्यादी व्यावसायिक योजनेतून वगळलेले आहेत.
करदाते अपात्र: मागील आर्थिक वर्षात आयकर भरलेले शेतकरी या योजनेपासून वंचित ठेवले गेले आहेत.
हप्त्याची स्थिती कशी तपासाल?
शेतकऱ्यांनी PM-KISAN योजनेच्या अधिकृत वेबसाईट (https://pmkisan.gov.in) वर जाऊन आपला हप्ता मिळाल्याची स्थिती तपासू शकता. यासाठी आपला आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर आवश्यक आहे. ही माहिती अद्ययावत नसल्यास पेमेंटमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.
हप्ता न मिळाल्यास शेतकऱ्यांनी काय करावे?
जर तुम्ही पात्र शेतकरी असाल आणि तुमची संपूर्ण माहिती आणि कागदपत्रे योग्य प्रकारे अपडेट केलेली असतील, तर तुम्हाला येत्या जून 2025 मध्ये 20 वा हप्ता निश्चितपणे मिळू शकतो. त्यामुळे खालील गोष्टींची खात्री करून घ्या.जसे की,
बँक खाते नंबर व IFSC कोड अपडेट आहे का?
आधार नंबर लिंक आहे का?
जमीन नोंदणीची माहिती अचूक आहे का?
e-KYC पूर्ण केली आहे का?
हप्ता कधी येणार?
अद्याप केंद्र सरकारकडून यासंदर्भात अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली, तरी जून 2025 च्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे.
Mumbai,Maharashtra