By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : शेतजमिनीपासून ते कृषी विभागापर्यंत..राज्य सरकारचे दोन मोठे निर्णय! काय फायदा होणार?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : शेतजमिनीपासून ते कृषी विभागापर्यंत..राज्य सरकारचे दोन मोठे निर्णय! काय फायदा होणार?
टॉप स्टोरीज़

Agriculture News : शेतजमिनीपासून ते कृषी विभागापर्यंत..राज्य सरकारचे दोन मोठे निर्णय! काय फायदा होणार?

News Desk
Last updated: 2025/05/28 at 7:56 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:May 28, 2025 1:07 PM IST

Agriculture News : राज्य सरकारची कॅबिनेट बैठक मंगळवारी (27 मे) पार पडली या बैठकीत कृषी क्षेत्रासाठी दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

News18

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी पार पडली असून, या बैठकीत कृषी क्षेत्राशी संबंधित दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांचा थेट फायदा शेतकऱ्यांबरोबरच कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनाही होणार आहे.

शेतजमिनीच्या वाटणीसाठी नोंदणी फी रद्द

शेतजमिनीच्या वाटपानंतर दस्त नोंदणीसाठी आकारली जाणारी नोंदणी फी यापुढे भरावी लागणार नाही. याआधी ही नोंदणी फी शेती आणि बिगरशेती मिळकतीसाठी एकसारखीच होती. ती जमिनीच्या बाजारमूल्याच्या 1 टक्के इतकी (कमाल 30,000 रुपये) आकारली जात होती. शेतीसाठी मुद्रांक शुल्क फक्त 100 रुपये असले तरी नोंदणी फीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ओझं येत होतं.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी होईल. तसेच कायदेशीर दस्तऐवजांची नोंदणी अधिक सुलभ होईल. मालकीचे स्पष्ट दस्तऐवजीकरण झाल्यामुळे भविष्यात होणारे जमिनीचे वाद टाळता येतील आणि शेतकऱ्यांना अनावश्यक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागणार नाही.

कृषी सहाय्यक व पर्यवेक्षकांच्या पदनामात बदल

या बैठकीत कृषी विभागातील कर्मचाऱ्यांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यानुसार, आता कृषी सहाय्यक (Krushi Sahayyak) यांना सहायक कृषी अधिकारी (Assistant Agricultural Officer) म्हणून ओळखले जाईल, तर कृषी पर्यवेक्षक (Agricultural Supervisor) हे उप कृषी अधिकारी (Sub Agricultural Officer) या नावाने ओळखले जातील.

नवे पदनाम 

कृषी सहाय्यक –  हे मुख्यतः गावपातळीवर काम करणारे कर्मचारी आहेत. त्यांच्या पदनामात बदल होऊन आता त्यांना सहायक कृषी अधिकारी म्हटले जाईल, मात्र त्यांचे काम व जबाबदाऱ्या पूर्ववत राहतील.

कृषी पर्यवेक्षक – जे जिल्हा किंवा तालुका पातळीवर क्षेत्रीय काम पाहतात, त्यांना आता उप कृषी अधिकारी म्हणून संबोधले जाईल. त्यांचे काम योजनांची अंमलबजावणी आणि निरीक्षणावर केंद्रित असते.

या निर्णयांमुळे कृषी विभागातील पदांची शिस्तबद्धता वाढेल, कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावेल आणि प्रशासनिक कार्यवाही अधिक स्पष्ट आणि पारदर्शक होईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

शेतजमिनीपासून ते कृषी विभागापर्यंत..राज्य सरकारचे दोन मोठे निर्णय! काय फायदा होणार?

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : शेतात टुमदार घर,बंगला बांधत असाल तर थांबा! अन्यथा पाडावं लागणार! नियम काय सांगतो? वाचा
Next Article एससीने आयसीआयसीआय सिक्युरिटीजची यादी कायम ठेवली, आयसीआयसीआय बँकेसह विलीनीकरणाचा मार्ग साफ केला – आयसीआयसीआय सिक्युरिटीजसाठी मोठा दिलासा एससी एससीला डिलिस्टिंग डिशेसचे समर्थन करते
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Property Rules : आजोबा-पणजोबांच्या मालमत्तेवर नातू दावा करू शकतो का? नियम काय सांगतो?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
10 अणुबॉम्ब युरेनियमच्या बरोबरीने बनविले जातात! इराणच्या अणु तळांवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने चिंता व्यक्त केली – इराण अणु साइट्स जेडी व्हॅन्सवर यूएस आर्स्रिक्सनंतर 400 किलो ग्रोजी युरेनियम हरवला.
Business June 25, 2025
Agriculture News : ग्रामपंचायतीच्या कारभारातील भ्रष्टाचार कसा ओळखायचा? कायदेशीर मार्ग काय? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
कृषी हवामान : पेरणी करत असाल तर सावधान! मुसळधार पाऊस पडणार, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?