1) टेरेस गार्डनिंग
शहरात गच्चीचा वापर फक्त कपडे सुकवण्यासाठी न करता, ती किचन गार्डन म्हणून वापरल्यास त्यातून चांगला व्यवसाय निर्माण होऊ शकतो. टोमॅटो, मिरची, पालक, कोथिंबीर, मेथी यांसारखी भाजीपाला गच्चीवर कुंड्यांमध्ये किंवा ग्रो-बॅगमध्ये सहज उगवता येतो. टेरेस गार्डनिंगचे प्रशिक्षण घेऊन इतरांना मार्गदर्शन करणे, रोपे विकणे, ऑर्गेनिक खत विकणे अशा सेवा देऊन व्यवसाय वाढवता येतो.
2) मशरूम शेती
मशरूम हे पौष्टिक आणि बाजारात महागड्या दराने विकले जाणारे उत्पादन आहे. त्याची शेती घराच्या गॅलरी,गोडाऊन किंवा टेरेसमध्ये केली जाऊ शकते. फारशा प्रकाशाची गरज नसल्याने बंद जागेतही उत्पादन घेता येते.मशरूमची मागणी हॉटेल्स,सुपरमार्केट आणि आरोग्यप्रेमी ग्राहकांमध्ये सतत वाढत आहे.विशेषतः ऑयस्टर मशरूम आणि बटन मशरूमची शेती शहरी भागात फायदेशीर ठरते.
3) मायक्रोग्रीन शेती
मायक्रोग्रीन्स म्हणजे भाजीपाल्याची अंकुरलेली रूपे, ज्या काही दिवसांत तयार होतात आणि अत्यंत पौष्टिक असतात.शहरी भागात ही शेती अत्यंत लोकप्रिय होत आहे. मायक्रोग्रीन्ससाठी मोठ्या जागेची गरज नसते, फक्त काही ट्रे, उत्तम बियाणे आणि योग्य हवामान याची काळजी घेतली तर घरातच उत्पन्न घेता येते. उपाहारगृह, फिटनेसप्रेमी, आणि हेल्दी डाएट करणाऱ्या ग्राहकांमध्ये त्याची मोठी मागणी आहे.
4) कंपोस्ट तयार करणे
शहरी भागात सेंद्रिय कचऱ्याचे प्रमाण मोठे आहे. घरातील फळफळावळ, भाजीपाल्याचे उरलेले भाग,गार्डनमधील पाने इ. वापरून कंपोस्ट तयार करता येते. ही सेंद्रिय खते गार्डनिंग करणाऱ्यांना विकून चांगले उत्पन्न मिळवता येते. कंपोस्टिंग मशीन लावून किंवा छोटे प्रकल्प राबवून या व्यवसायाची सुरुवात शक्य आहे. पर्यावरण रक्षण आणि नफा यांचा सुंदर मिश्रण म्हणजे कंपोस्टिंग होय.
5) हायड्रोपोनिक्स शेती
मातीशिवाय शेती म्हणजे हायड्रोपोनिक्स. ही आधुनिक शेतीपद्धत शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे लोकप्रिय होत आहे. शुद्ध पाण्यात पोषक द्रव्यांचा वापर करून भाज्या, फळे उगवली जातात. ही शेती बंद जागेत, कंट्रोल वातावरणात करता येते. सुरुवातीला गुंतवणूक लागते पण त्यात उत्पादनाची गुणवत्ता, शाश्वतता आणि मार्केट डिमांड जबरदस्त असते.
Mumbai,Maharashtra
June 15, 2025 1:36 PM IST