ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प कसा ठरतो?
प्रत्येक वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ग्रामविकास समितीची बैठक होते. यामध्ये आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, महिला सक्षमीकरण अशा विविध बाबींचा विचार करून गावाच्या गरजांनुसार प्राथमिकता निश्चित केली जाते. त्यानुसार निधीचा अंदाज घेतला जातो. मग ग्रामपंचायत अंदाजपत्रक तयार करून 31 डिसेंबरपर्यंत पंचायत समितीकडे पाठवते, जी नंतर जिल्हा स्तरावरून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवली जाते.
ग्रामपंचायतीला निधी कुठून मिळतो?
ग्रामपंचायतीला केंद्र आणि राज्य शासनाच्या 1100 हून अधिक योजनांमधून निधी प्राप्त होतो.
केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये 60% निधी केंद्राकडून आणि 40% राज्य सरकारकडून दिला जातो.
राज्य पुरस्कृत योजनांसाठी 100% निधी राज्य सरकार देते. याशिवाय काही योजना जिल्हा परिषद, पंचायत समिती, CSR निधी किंवा खासगी भागीदारीतूनही राबवल्या जातात.
‘ई-ग्राम स्वराज’ अॅपने पारदर्शकतेला बळ
ग्रामपंचायतीच्या खर्चावर नागरिकांचा विश्वास वाढवण्यासाठी 23 एप्रिल 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ई-ग्राम स्वराज’ अॅप लाँच केले. हे अॅप ग्रामपंचायतीच्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देते. कोणत्या कामासाठी किती निधी मंजूर झाला आणि किती खर्च झाला, याचा तपशील यात दिला जातो.
अॅपचा वापर कसा करावा?
e-Gram Swaraj अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडा.खालील तीन मुख्य पर्याय मिळतात:
ER Details – ग्रामपंचायतीतील सदस्यांची माहिती
Approved Activities – मंजूर विकासकामांचा तपशील
Financial Progress – निधी मिळाल्यापासून खर्चाचा सविस्तर अहवाल
Financial Progress या पर्यायावरून तुमच्या गावासाठी कोणत्या योजनेंतर्गत किती निधी मिळाला आणि तो कुठे खर्च झाला? याची माहिती स्पष्टपणे दिसते.
Mumbai,Maharashtra
June 15, 2025 3:08 PM IST
तुमची ग्रामपंचायत कुठे अन् किती पैसे खर्च करते? हे कसं तपासायचे? वाचा सविस्तर