चेरी शेती कशी करावी?
चेरीचं मूळ उगमस्थान युरोप मानलं जातं, पण हवामान आणि मातीच्या योग्य व्यवस्थापनासह ती महाराष्ट्रात यशस्वीपणे घेता येते. विशेषतः सातारा, पुणे, नाशिक, जळगाव, लातूर, अहमदनगर या थंड हवामान असलेल्या भागांत चेरी लागवडीस चांगली संधी आहे.
हवामान कसं असावे?
चेरीला थोडं थंड हवामान लागते, त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लागवड केल्यास चांगला परिणाम मिळतो.
लागवडीसाठी माती आणि पाणी व्यवस्थापन
जमीन चांगली निचरा होणारी, जैविकदृष्ट्या समृद्ध आणि थोडी अल्कध माती योग्य ठरते.
तर ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून दररोज योग्य प्रमाणात पाणी द्यावे.
उत्पन्न किती मिळू शकते?
एका एकर क्षेत्रात 300-350 झाडे लावली जातात. एक झाड 3–4 वर्षात उत्पादन देण्यास सुरुवात करते आणि प्रति झाड सरासरी 8–10 किलो फळं मिळतात. बाजारात चेरीच्या फळांना 400 ते 1,000 रु प्रति किलो दर मिळतो. याप्रमाणे, योग्य व्यवस्थापन केल्यास एका एकरातून दरवर्षी 5 ते 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.
प्रोसेसिंग आणि थेट विक्री
केवळ ताज्या फळांची विक्रीच नव्हे, तर चेरीपासून जॅम, ज्यूस, वाईन, ड्राय फ्रूट्स अशा अनेक प्रक्रिया करता येतात. जर शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांना विक्री केली, तर दरामध्ये भरघोस नफा मिळू शकतो. शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे एकत्र येऊन ब्रँडिंग आणि पॅकेजिंग केल्यास देशांतर्गत व निर्यात मार्केटदेखील खुले होऊ शकते.
दरम्यान, राज्यातील हवामान बदल, उत्पन्नावर असलेले नियंत्रण आणि बाजारातील स्पर्धा यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणं धोक्याचं ठरतंय. अशावेळी चेरीसारखी उच्च मूल्य असलेली फळपीक शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
Mumbai,Maharashtra
June 16, 2025 12:40 PM IST