Last Updated:
Agriculture News : पारंपरिक शेतीसोबतच आता शेतकरी नव्या प्रयोगांकडे वळू लागले आहेत. त्यामध्येच एक आकर्षक आणि फायदेशीर पर्याय म्हणजे अवॉकेडो फळाची शेती. ‘बटर फ्रूट’ म्हणून ओळखले जाणारे हे फळ आरोग्यदृष्ट्या खूप महत्त्वाचे असून भारतात त्याला वाढती मागणी आहे.
मुंबई : पारंपरिक शेतीसोबतच आता शेतकरी नव्या प्रयोगांकडे वळू लागले आहेत. त्यामध्येच एक आकर्षक आणि फायदेशीर पर्याय म्हणजे अवॉकेडो फळाची शेती. ‘बटर फ्रूट’ म्हणून ओळखले जाणारे हे फळ आरोग्यदृष्ट्या खूप महत्त्वाचे असून भारतात त्याला वाढती मागणी आहे. कमी स्पर्धा, चांगला बाजारभाव आणि निर्यातक्षम गुणधर्म यामुळे अवॉकेडो हे उच्च उत्पन्न देणारे पीक ठरत आहे. योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास शेतकरी प्रतिवर्ष लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू शकतो.
अवॉकेडो, आरोग्यदायी आणि आकर्षक फळ
अवॉकेडो हे फळ व्हिटॅमिन्स, हेल्दी फॅट्स आणि फायबर्स ने समृद्ध आहे. त्यामुळे ते डाएट, फिटनेस, सौंदर्यप्रसाधने आणि औषध उद्योगात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. शहरी भागांत विशेषतः मोठ्या सुपरमार्केट्स, ऑनलाइन ग्रोसरी प्लॅटफॉर्म आणि फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये याची सतत मागणी असते.
कशी करावी अवॉकेडोची शेती?
अवॉकेडो हे उष्ण हवामानात चांगले वाढते. उंच टेकड्यांचे भाग, थोडेसे थंड व सौम्य हवामान आणि चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते. लागवड करताना प्रतिझाड अंतर 8 x 8 मीटर इतकं असावं. एक हेक्टरमध्ये सुमारे 150 झाडे बसतात.झाडाला फळधारणा सुरू होण्यासाठी 3 ते 4 वर्षे लागतात. एक झाड वर्षाला सरासरी 200-250 फळे देऊ शकते
उत्पन्न आणि नफा कसा मिळतो?
एक अवॉकेडो फळाचे बाजारमूल्य सध्या 100 रु ते 250 रुपयांपर्यंत असते. एक झाड जर 200 फळे देत असेल तर 150 झाडांपासून 30,000 फळे मिळू शकतात. फळे सरासरी 100 दराने विकली,तरीही उत्पन्न 30 लाख रुपये होते. उत्पादन खर्च वगळता सरासरी नफा 18 रु ते 20 लाख प्रतिवर्ष इतका मिळू शकतो.
Mumbai,Maharashtra
June 24, 2025 12:35 PM IST