या योजनेचा 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये जारी झाला होता. त्यावेळी जवळपास 22,000 कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले. दर तीन महिन्यांनी हप्ते वितरित केले जातात. त्यामुळे 20 वा हप्ता जून महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता आहे. मात्र,या हप्त्याची अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही.
सरकारने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही शेतकऱ्याने ई-केवायसी पूर्ण न केल्यास हप्ता रोखला जाऊ शकतो. ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर OTPच्या साहाय्याने प्रक्रिया पूर्ण करू शकता. तसेच, जर ऑनलाईन सुविधा उपलब्ध नसेल, तर जवळच्या CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक ई-केवायसी करावी लागेल.
सर्वप्रथम www.pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
उजव्या बाजूला असलेल्या ‘नो युअर स्टेटस’ या लिंकवर क्लिक करा.
नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका.
‘डेटा मिळवा’ या बटणावर क्लिक केल्यावर तुमची स्थिती स्क्रीनवर दिसेल.
लाभार्थी यादीत आपले नाव तपासण्याची पद्धत
वेबसाइटवर ‘लाभार्थी यादी’ विभाग उघडा.
राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव यांची माहिती भरून ‘रिपोर्ट मिळवा’ या बटणावर क्लिक करा.
त्या गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी दिसेल. त्यात आपले नाव शोधा.
अर्जदार भारतीय नागरिक असावा.
त्याच्या नावावर शेतीयोग्य जमीन असावी.
लहान आणि सीमांत शेतकरीच पात्र ठरतात.
सरकारी नोकरी करणारे अथवा पेन्शनधारक या योजनेच्या कक्षेत येत नाहीत.
pmkisan.gov.in या पोर्टलवर जा.
‘नवीन शेतकरी नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करा.
आधार क्रमांक, कॅप्चा व अन्य तपशील भरा.
फॉर्म भरल्यानंतर ‘सबमिट’ करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.
Mumbai,Maharashtra
June 28, 2025 2:27 PM IST