या योजनेअंतर्गत पुढील हप्ता जूनमध्ये मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, अद्याप सरकारकडून या हप्त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता जारी करू शकतात. त्यामुळे नावातील चूक तातडीने सुधारून घ्या, अन्यथा पेमेंट अडकू शकते.
जर आधार कार्डावर असलेले नाव आणि पीएम किसानमध्ये नोंदलेले नाव वेगळे असेल, तर तुम्ही घरी बसून किंवा जवळच्या केंद्रात जाऊन हे दुरुस्ती करू शकता.
https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा.
‘शेतकरी कॉर्नर’ विभागातील ‘स्वयं-नोंदणीकृत शेतकऱ्याचे अपडेट’ या पर्यायावर क्लिक करा.
तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरून पुढे जा.
त्यानंतर आधारवर असलेले योग्य नाव निवडा.
नाव अपडेट करून सबमिट करा.
जर ऑनलाईन सुविधा उपलब्ध नसेल, तर जवळच्या CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) किंवा कृषी विभाग कार्यालयात जाऊ शकता. त्यासाठी सोबत खालील कागदपत्रे घ्या जसे की,
आधार कार्ड
जमीन नोंदीची प्रत (7/12 उतारा)
बँक पासबुक
किसान आयडी (असल्यास)
केंद्रातील कर्मचारी तुमचे नाव योग्य रित्या दुरुस्त करतील.
नावातील विसंगती दूर केले नाहीतर तुमचे पेमेंट रोखले जाऊ शकते. सुधारणा झाल्यानंतर पोर्टलवर तुमची स्थिती तपासायला विसरू नका. आणखी मदतीसाठी पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 011-24300606 वर संपर्क साधू शकता.
Mumbai,Maharashtra
June 28, 2025 4:44 PM IST
आधार कार्ड अन् PM Kisan मध्ये नोंदवलेल्या नावांमध्ये फरक आहे का? मग तातडीने हे काम करून घ्या