ग्रामपंचायत हद्दीत जमीन-घर खरेदी करताना सर्वप्रथम त्या जमिनीचा ७/१२ उतारा आणि ८-अ उतारा तपासावा. यावर मूळ मालकाचे नाव, जमिनीचा प्रकार (शेती, बागायत, नॉन अॅग्रीकल्चर), क्षेत्रफळ याची नोंद असते. ही जमीन खरीच विक्रेत्याच्या नावावर आहे का, त्यावर कोणतेही वाद आहेत का, याची खात्री करणे महत्त्वाचे ठरते.
पुढे त्या जमिनीचे गाव नमुना नं.8 आणि फेरफार नोंदी (mutation entries) देखील तपासाव्यात. काही वेळा फेरफार नोंद झालेली नसते, ज्यामुळे नंतर मालकी हक्कावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यानंतर मालकीचा सलग पुरावा (Chain of Title Deeds) मागवावा, म्हणजे मागील विक्री व्यवहारांची सर्व कागदपत्रे, वसीयत किंवा वाटणीपत्र.
जमीन खरेदी करण्याआधी ती जमीन नॉन अॅग्रीकल्चर (NA) जमीन आहे का, याची खात्री करावी लागते. जर ती शेती जमिन असेल, तर ती घरबांधणीसाठी वापरता येणार नाही, त्यामुळे त्यासाठी NA परवाना आवश्यक आहे. ग्रामपंचायत, तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातून NA प्रमाणपत्र मिळवता येते.
घर खरेदी करत असाल, तर त्या घराची बांधकाम परवानगी (Building Permission) व पूर्णत्व प्रमाणपत्र (Completion Certificate) पहावे. घरावर कोणतेही कर्ज, वाद किंवा जप्ती नाही, हे एनकंब्रन्स सर्टिफिकेट (Encumbrance Certificate) वरून तपासता येते.
सात-बारा उतारा (7/12)
आठ-अ उतारा
गाव नमुना नं.8
फेरफार नोंद/म्युटेशन एन्ट्री
पावती व करभरण्याचा पुरावा
नॉन अॅग्रीकल्चर प्रमाणपत्र (NA)
एनकंब्रन्स सर्टिफिकेट
बांधकाम परवानगी/पूर्णत्व प्रमाणपत्र (घर असेल तर)
वीज, पाणी नोंदणी कागदपत्रे (घर असल्यास)
ओळखपत्रे (खरेदीदार व विक्रेता)
सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर विक्री व्यवहारासाठी बाजारभाव प्रमाणपत्र (Market Value Certificate) प्राप्त करावे लागते. त्यानंतर योग्य स्टॅम्प ड्युटी भरून विक्री दस्त (Sale Deed) नोंदणी कार्यालयात नोंदवावी. विक्री दस्त नोंदणीनंतर त्या जमिनीचे नाव खरेदीदाराच्या नावे फेरफार नोंदणीसाठी अर्ज करावा लागतो. नंतर ग्रामपंचायतीमध्ये मालक बदलाची नोंद करून मिळकत कर रजिस्टर अपडेट करणे आवश्यक असते. त्यामुळे महसूल रेकॉर्ड व ग्रामपंचायत दोन्हीकडे मालकी बदलाची नोंद होते.
Mumbai,Maharashtra
June 29, 2025 1:39 PM IST
ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जमीन,घर खरेदी कशी केली जाते? आवश्यक कागदपत्रे कोणती?