मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये 18 वा हप्ता वितरित करण्यात आला होता आणि फेब्रुवारी 2025 मध्ये 19 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला. या योजनेनुसार दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपयांचा हप्ता नियमितपणे देण्यात येतो. मात्र यावेळी 20 वा हप्ता मिळायला उशीर का झाला? याचे कारणही समोर आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या टप्प्यात सरकारने काही नवे नियम आणि अटी लागू केल्या होत्या.जसे की, ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करणे. बँक खाते आधारशी जोडणे, नाव,कागदपत्रे व रेकॉर्ड तपासणी. अनेक शेतकऱ्यांनी या प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेल्या नाहीत. सरकारला असे वाटते की यामुळे अनेकांना या हप्त्यात पैसे मिळू शकले नसते. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना संधी देण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
जे शेतकरी या प्रक्रियेत वेळेत कागदपत्रे पडताळणी पूर्ण करणार नाहीत, त्यांचे नावे या हप्त्याच्या यादीतून वगळले जातील, जरी त्यांची नोंदणी आधीच झाली असली तरीही. मिळालेल्या माहितीनुसार, सरकार येत्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात कोणत्यातरी मोठ्या कार्यक्रमाद्वारे 20 वा हप्ता जारी करणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर कागदपत्र तपासणी पूर्ण करावी, अशी सूचना केली जात आहे.
ई-केवायसी करा – ती पूर्ण न केल्यास हप्ता रोखला जाईल.
बँक खाते आधारशी लिंक करा – रक्कम फक्त लिंक खात्यातच जमा होईल.
नावातील स्पेलिंग व माहितीची शुद्धता तपासा – आधार, बँक आणि पोर्टलवर नाव एकसारखे असावे.
जमिनीचे रेकॉर्ड पडताळा – राज्य सरकारने मान्य केलेली नोंदणी आवश्यक.
मोबाईल नंबर व पत्ता अचूक ठेवा – चुकीमुळे हप्ता थांबू शकतो.
बँक खाते सक्रिय ठेवा – निष्क्रिय खात्यात पैसे येणार नाहीत.
डुप्लिकेट नोंदणी टाळा – एकच शेतकरी दोनदा नोंदणी केल्यास लाभ थांबेल.
आधारवरील माहिती योग्य करा – नाव, जन्मतारीख व लिंग यात विसंगती असल्यास तातडीने दुरुस्ती करा.
Mumbai,Maharashtra
June 30, 2025 3:43 PM IST