Last Updated:
अतिश काळे असे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केलेल्या तरुणाचे नाव असून त्याचे शिक्षण इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी मास्टर केले आहे. तर या व्यवसायातून वर्षाला 80 लाख ते 1 कोटी रुपयांची उलाढाल होत आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात राहणाऱ्या उच्च शिक्षित तरुणाने नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. अतिश काळे असे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केलेल्या तरुणाचे नाव असून त्याचे शिक्षण इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी मास्टर केले आहे. तर या व्यवसायातून वर्षाला 80 लाख ते 1 कोटी रुपयांची उलाढाल होत आहे.
पंढरपूर तालुक्यात राहणाऱ्या अतिश लक्ष्मण काळे यांनी पुण्यातून शिक्षण घेऊन गावाकडे परत आले. नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा निर्णय अतिशने घेतला. थोडे मामांकडून तर थोडे वडिलांनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करायला आर्थिक मदत केली. शेड आणि 5 हजार कोंबड्या आणि इतर खर्च मिळून जवळपास 15 लाख रुपयांपर्यंत अतिश यांना खर्च आला आहे.
कुक्कुटपालन करण्यासाठी त्यांनी कावेरी जातीच्या कोंबड्यांची निवड केली आहे. कावेरी जातीची एक कोंबडी व्यापारी 180 ते 200 रुपयांपर्यंत खरेदी करतात. तर कावेरी जातीचा एक पक्षी मोठा होण्यासाठी 70 ते 90 दिवसांचा कालावधी लागतो. तर यांच्या खाद्याचे नियोजन पक्षाच्या वयानुसार तीन टप्प्यात केले जाते. कावेरी पक्षी मास विक्रीसाठी केला जातो. त्यांना जास्त डोस नसतात, रेग्युलर औषध दिले जाते जे वातावरणानुसार बदलत जाते. तर या व्यवसायातून अतिश काळे हे वर्षाला 80 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.
आखाड महिन्यात यात्रा सुरू होते, यात्रेत पंढरपूरसह आजूबाजूच्या गावातून सुद्धा वर्षातून एकदा कोंबड्यांना जास्त मागणी असते. त्यावेळेस जास्त कोंबड्यांना मागणी असते. त्यामुळे अतिश यांनी सर्वात जास्त नर जातीचे 4 हजार पक्षी सध्या अतिश यांच्या फार्ममध्ये आहेत. तर यात्रा कालावधीत एक कोंबडीची किंमत 220 ते 250 रुपयांपर्यंत प्रति किलो विक्री केली जाते. अतिश यांचे कोंबड्यांचे दोन शेड असून वर्षातून तीन ते चार बॅच निघत असतात. तर या व्यवसायातून 80 लाख ते 1 कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती अतिश काळे यांनी दिली.
Solapur,Maharashtra
June 30, 2025 12:45 PM IST
Success Story: इकॉनॉमिकमध्ये मास्टर, गावी येऊन सुरू केलं कुक्कुटपालन, आता वर्षाला 1 कोटी रुपयांची उलाढाल