गावठी कोंबड्या म्हणजे पारंपरिक जातीच्या कोंबड्या, ज्या स्थानिक हवामानाशी जुळवून घेतात आणि नैसर्गिक वातावरणात वाढतात. त्यांना औषधांची गरज कमी भासते आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती उत्तम असते. त्यामुळे त्यांचा संगोपन खर्च तुलनेत कमी होतो.
गावठी कुक्कुटपालन सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरुवातीला 100-200 कोंबड्यांची व्यवस्था करावी. 500-600 चौरस फुटांची साधी शेड, चांगली वेंटिलेशन व्यवस्था आणि सडसडीत ओलावा टाळण्यासाठी बांधकाम करावे लागते. एक चांगल्या जातीची कोंबडी साधारण 150-250 रु मध्ये मिळते.
मक्याचं पीठ,बाजरी,तांदूळ कुट्ट,हिरव्या भाज्या आणि किडे,किडकं या नैसर्गिक आहारावर कोंबड्या सहज वाढतात. सूरूवातीची गुंतवणूक सुमारे 50,000 ते 70,000 दरम्यान होते. एकदा शेड,भांडी,पाणी व्यवस्था झाली की पुढचा खर्च कमी राहतो.
अंडी – गावठी कोंबडी वर्षाला सुमारे 100 ते 150 अंडी देते. गावठी अंड्याची किंमत बाजारात 10 ते 15 प्रति नग असते. म्हणजे 200 कोंबड्या वर्षाला 20,000 ते 30,000 अंडी देऊ शकतात. अंड्यांची विक्री करूनच किमान 2.5 ते 3 रु लाखांचा उत्पन्न मिळू शकतो.
मांस – 5-6 महिन्यांत कोंबड्या विक्रीसाठी तयार होतात. एक गावठी कोंबडी सुमारे 1.5-2 किलो वजनाची होते आणि बाजारात प्रतिकिलो 400 ते 500 रु पर्यंत दर मिळतो.
अंडी आणि मांस या दोन्ही विक्रीतून वर्षभरात 5 ते 7 लाख रुपये सहज उत्पन्न मिळवता येते. खर्च वजा केल्यावर किमान 2 ते 3 लाखांचा निव्वळ नफा राहतो.
आज शहरी भागात गावठी अंड्यांना प्रचंड मागणी आहे. अनेक दुकानदार, हॉटेल्स थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. स्थानिक बाजारपेठ, आठवडे बाजार येथे नियमित पुरवठा करता येतो. ऑनलाईन ऑर्डरही घेता येते.
Mumbai,Maharashtra
July 01, 2025 2:33 PM IST
सूरवातीला 50,000 रु खर्च, नंतर लाखांत कमाई, गावठी कुकुटपालन व्यवसायाचे असं करा नियोजन