Last Updated:
Property News : आपल्या कुटुंबात वडिलोपार्जित संपत्तीचे वाटप करताना अनेकदा वादविवाद निर्माण होतात. कित्येकदा काही भावंडे आपला हक्क सोडतात, तर काहींना आपल्या अधिकाराची जाणीव होते आणि ते त्यासाठी दावा करतात.
मुंबई: आपल्या कुटुंबात वडिलोपार्जित संपत्तीचे वाटप करताना अनेकदा वादविवाद निर्माण होतात. कित्येकदा काही भावंडे आपला हक्क सोडतात, तर काहींना आपल्या अधिकाराची जाणीव होते आणि ते त्यासाठी दावा करतात. उदाहरणार्थ, चार बहिणी आणि एक भाऊ आहेत. आई-वडील दोघेही जिवंत आहेत. त्यापैकी तीन बहिणींनी स्वतःचा हक्क कायदेशीरपणे सोडला आहे. आणि एकच बहिण मालमत्तेवर आपला वाटा मागत आहे. अशावेळी शेवटी नेमका किती हिस्सा द्यावा लागणार? हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
प्रथम लक्षात घ्या की वडिलोपार्जित संपत्तीवर कोणाचा किती हक्क आहे, हे हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 आणि त्यातील सुधारणा यांच्या अधीन ठरते. वडिलोपार्जित मालमत्तेवर सर्व वंशजांचा जन्मसिद्ध हक्क असतो. म्हणजेच, मुलगा-मुलगी दोघांनाही समान वाटा मिळतो.
जसं आपण उदाहरण पहिलं की पाच मुलं (चार मुली व एक मुलगा) आणि जिवंत आई-वडील आहेत. जर वडील जिवंत असतील आणि मालमत्तेचे मूळ मालक असतील, तर ते स्वतःहून वाटप करू शकतात. परंतु जर मालमत्ता वडिलांच्या नावावर नसून आधीच्या पिढीतून (वडील, आजोबा वगैरे) वडिलोपार्जित आली असेल, तर सर्व मुलांना स्वतःचा हक्क आपोआप प्राप्त होतो.
तीन बहिणींनी जर आपला हक्क रिलिन्क्विशमेंट डीड (हक्कत्यागाचा दस्तऐवज) नोंदणी कार्यालयात नोंदवून अधिकृतपणे सोडला असेल, तर त्या त्या संपत्तीच्या वाटपातून कायम वगळल्या जातील. याची खात्री करण्यासाठी त्या दस्तऐवजाच्या नोंदणीची प्रत ठेवणे आवश्यक असते. तोंडी हक्कत्याग वैध मानला जात नाही.
जर तीन बहिणी आपला हक्क कायदेशीररित्या सोडल्या असतील, तर संपत्तीमध्ये उरलेल्या व्यक्तींमध्ये हिस्सा वाटला जातो. म्हणजे उरलेल्या चार वारस असतील. एक बहिण (जिनं हक्क सोडला नाही), एक भाऊ, आई-वडील (जर वडील मालक नसतील तर ते वारस असतील, मालक असतील तर ते वाटप निश्चित करू शकतात) म्हणजे उरलेल्या चार जणांत समान वाटा पडतो. प्रत्येकाला एक चतुर्थांश (1/4) हिस्सा मिळतो. उदाहरणार्थ, जर मालमत्ता 40 लाखांची असेल, तर या बहिणीला तिचा एकचौथाई हक्क म्हणजे 10 लाख रुपये किंवा त्या समकक्ष संपत्ती मिळविण्याचा अधिकार राहील.
(महत्वाची सूचना – कोणतीही कारवाई करताना कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)
Mumbai,Maharashtra
July 04, 2025 10:13 AM IST
तीन पैकी दोन बहिणींनी मालमत्तेचा हक्क सोडला, एक बहिणीला वडील, भाऊ किती संपत्ती देऊ शकता?