गांडूळ खत म्हणजे गांडूळांच्या साहाय्याने सेंद्रिय कचऱ्याचे आणि शेणखताचे प्रक्रियेतून उच्च दर्जाच्या खतात रूपांतर. यात पोषक तत्त्वे मुबलक प्रमाणात असतात, जी मातीचे आरोग्य सुधारतात आणि पिकांना उत्तम वाढ देतात.
गांडूळ खत प्रकल्प सुरू करण्यासाठी काय करावे?
गांडूळ खत निर्मितीसाठी सावलीची जागा निवडावी. शेड टाकल्यास गांडूळांना उन्हापासून संरक्षण मिळते. एकूण 10 बाय 10 फूट जागेत सुरुवात करता येते.
गोठ्यातील शेण, सेंद्रिय कचरा, पिकांचे अवशेष, पालापाचोळा हे सर्व कच्चा माल म्हणून वापरले जातात. यातील ओलावा 60-70% असावा.
‘आइसिनिया फेटिडा’ किंवा ‘युरोफायलस युगेनिया’ या जातीचे गांडूळ खतासाठी सर्वोत्तम मानले जातात.
सर्व कच्चा माल एकत्र करून 10 ते 15 दिवसांपर्यंत कुजवावा. नंतर त्यावर गांडूळ सोडावेत. साधारण 4 ते 6 आठवड्यांत गांडूळ खत तयार होते.
दर 3 ते 4 दिवसांनी ओलावा टिकवण्यासाठी पाणी शिंपडावे. खूप पाणी साचू देऊ नये.
प्रारंभी 25,000 ते 50,000 रुपयांपर्यंत खर्च येतो. गांडूळ खत प्रतिकिलो 5 ते 30 रुपये दराने विक्री करता येते. दरवर्षी 10 ते 12 टन गांडूळ खत तयार होत असल्यास लाखो रुपयांची कमाई शक्य होते. गांडूळ विक्रीतूनही अतिरिक्त उत्पन्न मिळते.
सेंद्रिय शेतकरी,नर्सरी,फळबाग उत्पादकांना गांडूळ खताची मोठी मागणी असते. कृषी सेवा केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच ऑनलाईन पोर्टलवरून विक्री करता येते.
गांडूळ खत प्रकल्पासाठी कृषी विभागाकडून आणि आत्मा योजनेअंतर्गत अनुदान मिळते. शेड उभारणी व गांडूळ खरेदीवरही काही ठिकाणी सबसिडी दिली जाते. जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करता येतो.
Mumbai,Maharashtra
July 04, 2025 2:29 PM IST