शेतकऱ्यांनी जमिनीची योग्य मशागत, योग्य बियाण्यांची निवड, वेळेवर पेरणी आणि खत-सिंचन व्यवस्थापन यांसोबतच तण नियंत्रणावर लक्ष केंद्रीत करावे. अनेक ठिकाणी मजुरी दर वाढले आहेत तसेच मजुरांची उपलब्धताही मर्यादित असते. अशावेळी रासायनिक तणनाशकांचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र तणनाशकांचा वापर शिफारशीनुसारच करावा, असा कृषी तज्ज्ञांचा सल्ला आहे.
पिकनिहाय सल्ला
पेरणीनंतर 20-30 दिवसांच्या कालावधीत दोन वेळा कोळपणी व निंदणी करून शेत तणमुक्त ठेवावे. फुलोऱ्यानंतर कोळपणी टाळावी. सतत पाऊस किंवा मजुरांची अनुपलब्धता असल्यास रासायनिक तणनाशकांचा वापर करावा. पेरणीनंतर 15-20 दिवसांनी तणांच्या 2 ते 4 पानांच्या अवस्थेत इमॅझिथापर (35%) आणि इमॅझोमॅक्स (35%) संयुक्त तणनाशक 100 ग्रॅम प्रति हेक्टर, क्विझॉलोफॉप इथाईल (5% ईसी) 400 मिली किंवा इमॅझिथापर (10% एसएल) 750-1000 मिली प्रति हेक्टर फवारावे.
लागवडीनंतर 30 दिवस पीक तणमुक्त ठेवावे. दोन वेळा निंदणी व तीन-चार वेळा वखरणी करावी. तण नियंत्रणासाठी गोलपान तणांसाठी पायरीथायोबॅक सोडिअम 625 मिली प्रति हेक्टर, गवतवर्गीय तणांसाठी क्विझॉलोफॉप इथाईल 500 मिली प्रति हेक्टर फवारणी करावी. तणनाशकांचा सतत वापर टाळावा.
पेरणीनंतर 10 ते 12 दिवस शेताची राखण करावी. 8 ते 10 दिवसांनी विरळणी करून एका चौफुल्यावर एकच जोमदार रोप ठेवावे. सुरुवातीच्या 20 दिवसात शेतात पाणी साचू देऊ नये. तण नियंत्रणासाठी 1-2 खुरपण्या व कोळपण्या कराव्यात. तणनाशकांसाठी 2,4-डी 12.5-20 ग्रॅम किंवा टेम्ब्रोट्राइन 5.8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळावे.
पिकाची वाढ जोमदार होण्यासाठी 15-20 दिवसांनी पहिली कोळपणी, त्यानंतर 15 दिवसांनी खुरपणी करावी. पेरणीनंतर 30-45 दिवस शेत तणविरहित ठेवावे. रासायनिक तणनाशक म्हणून इमॅझिथायपर-इमॅझोमॅक्स 2 ग्रॅम किंवा इमॅझिथायपर (10% ईसी) 15-20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळावे.
20-25 दिवसांनी पहिली आणि 30-35 दिवसांनी दुसरी कोळपणी करावी. कोळपणीनंतर तण काढण्यासाठी खुरपणी करावी. पिके 30-45 दिवस तणविरहित ठेवावीत.
पेरणीनंतर 10-12 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 कोळपण्या व दोन खुरपण्या कराव्यात. शेवटची कोळपणी खोल करावी. आऱ्या जमिनीत गेल्यावर आंतरमशागत थांबवावी. तण नियंत्रणासाठी इमॅझिथापर किंवा क्विझॉलोफॉप इथाईल 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारावे.
दरम्यान ,अशा प्रकारे एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादन वाढेल व खर्चही कमी राहील, असा कृषी तज्ज्ञांचा सल्ला आहे.
Mumbai,Maharashtra
July 07, 2025 9:36 AM IST