शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार, अनेकदा त्यांना निकृष्ट दर्जाची बियाणे, खते किंवा कीटकनाशके विकली जातात. काही ठिकाणी याच वस्तू शासकीय दरापेक्षा अधिक किंमतीत विकल्या जातात, तर काहीजण पक्की पावतीही देत नाहीत. एवढेच नव्हे तर बियाणे आणि खते काळ्या बाजारात विकले जात असल्याचे प्रकारही उघड झाले आहेत, ज्यामुळे गरजू शेतकऱ्यांना वेळेत साहित्य मिळत नाही.
कृषी विभागाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी तक्रार निवारण समित्या, कृषी अधिकारी, आणि भरारी पथके सक्रिय केली आहेत. एखाद्या शेतकऱ्याला फसवणुकीचा अनुभव आला असल्यास, तो बियाणे विक्रेत्याचे पक्के बिल, फसवणुकीचा तपशील व इतर संबंधित माहिती यांसह तक्रार नोंदवू शकतो. ही तक्रार संबंधित तालुका कृषी कार्यालयात, तक्रार निवारण समितीकडे किंवा भरारी पथकाकडे दिली जाऊ शकते.
फसवणुकीच्या तक्रारीत खालील बाबींचा समावेश असावा जसे की,
बियाणे उगवत नाहीत किंवा खराब आहेत.
खते किंवा कीटकनाशकांचा दर्जा निकृष्ट आहे.
शासकीय दरापेक्षा जास्त किंमत आकारण्यात आली.
पक्की पावती न दिली जाणे.
काळ्या बाजारातून साहित्य विक्री.
या तक्रारी मिळाल्यावर कृषी विभागाकडून संबंधित विक्रेत्यांविरुद्ध चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाते. काही गंभीर प्रकरणांमध्ये परवाना रद्द करणे किंवा दंडात्मक कारवाईदेखील केली जाऊ शकते.
शेतकऱ्यांची अडचण ओळखून कृषी विभागाने खरीप हंगाम सुरू होण्याच्या आधीच बियाणे व खते उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रणासाठी निरीक्षक नेमले गेले असून, वितरण केंद्रांवरही निगराणी वाढवण्यात आली आहे.
बियाणे व खरेदी करताना नेहमी पक्की पावती घ्या. शासकीय दर यादी तपासा. विक्रेत्यांची परवाना स्थिती पाहा.फसवणूक झाल्यास त्वरित तक्रार नोंदवा
Mumbai,Maharashtra
July 08, 2025 9:46 AM IST