मात्र, काही शेतकऱ्यांना अद्यापही मागील हप्ते मिळालेले नाहीत, तर काहींच्या खात्यात आगामी हप्ता थांबू शकतो. यासाठी काही महत्त्वाच्या अटी आणि प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
20 वा हप्ता वेळेत मिळवण्यासाठी ‘ही’ कामं तात्काळ करा
योजना लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. pmkisan.gov.in वर स्वतः ऑनलाइन e-KYC करा. किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) वर जाऊन बायोमट्रिकद्वारे प्रक्रिया पूर्ण करा. E-KYC न झाल्यास,हप्ता मिळणार नाही.
शेती जमीन रेकॉर्डमध्ये नोंदलेली व पडताळलेली असावी लागते. तुमच्या नावावर शेतजमीन आहे याचा पुरावा आवश्यक. रेकॉर्डमध्ये चूक असल्यास तहसील कार्यालयात तात्काळ दुरुस्ती करून घ्या.
बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. अन्यथा DBT रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही. तुमच्या बँकेत जाऊन आधार लिंकिंग फॉर्म भरून प्रक्रिया पूर्ण करा.
मोबाईल नंबर चुकीचा असल्यास OTP प्रक्रियेअभावी तुमचा हप्ता थांबू शकतो. पीएम किसान पोर्टलवर जाऊन ‘Update Mobile Number’ पर्याय वापरून नंबर सुधारावा.
‘Beneficiary Status’ मध्ये तुमचे नाव, खाते क्रमांक आणि हप्त्याची माहिती पाहता येते. नाव दिसत नसेल, तर तुमच्या ग्रामसेवक, तलाठी किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.
अधिकृत वेबसाइट www.pmkisan.gov.in तसेच टोल-फ्री हेल्पलाईन
155261, 1800-11-5526, 011-23381092 या नंबरवर संपर्क साधा.
मिळालेल्या माहितीनुसार 18 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिहारमध्ये मोठा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात 20 व्या हप्त्याचे वितरण होऊ शकते. जूनमध्येच हा हप्ता येणं अपेक्षित होता. मात्र त्याला आता उशीर झाला आहे.
Mumbai,Maharashtra
July 08, 2025 2:27 PM IST
PM Kisan चा 20 वा हप्ता येण्याआधी 4 कामे तातडीने करून घ्या, अन्यथा मिळणार नाहीत पैसे