या निर्णयामुळे आर्थिक मदतीचा मार्ग अधिक सुलभ होणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधी विशिष्ट मर्यादेपर्यंत तारणाशिवाय कर्ज मिळत होते. मात्र, आता जर अर्जदाराने स्वेच्छेने आपले सोने अथवा चांदी गहाण ठेवण्याची इच्छा दर्शवली, तर बँकेने त्यास नकार देऊ नये, असा स्पष्ट आदेश रिझर्व्ह बँकेने बँकांना दिला आहे.
RBI च्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील शेतकरी आणि लहान व्यावसायिकांना होणार आहे. विशेषतः ज्यांच्याकडे जमीन तशी आहे, पण अन्य तारण नाही, अशा शेतकऱ्यांसाठी हे मोठे आर्थिक साहाय्य ठरेल. ग्रामीण भागात सोने ही सहज उपलब्ध संपत्ती असल्याने, आता या संपत्तीच्या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक असणारे इनपुट्स, बियाणं, खते यासाठी आर्थिक मदत मिळणे शक्य होणार आहे.
बँकांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सोने किंवा चांदी गहाण घेण्याची परवानगी. अर्जदाराने स्वेच्छेने तारण देण्याची इच्छा दर्शवली, तर ती नाकारता येणार नाही.
या धोरणामुळे तारणाशिवाय कर्ज घेणाऱ्या योजनांना कोणतीही बाधा होणार नाही.
बँक अधिकारी सांगतात की, नव्या नियमानुसार कोणताही अर्जदार अन्य लाभांपासून वंचित राहणार नाही.
2023 मध्ये RBI ने सुवर्ण तारण कर्ज (Gold Loan) नियम अधिक कठोर करत सर्व दागिन्यांवर दिले जाणारे कर्ज ‘गोल्ड लोन’ म्हणून नोंदवावे, असे आदेश दिले होते.
गोल्ड लोन कमी जोखमीचे असल्यामुळे बँकांसाठीही हे फायदेशीर ठरत आहे. विशेषतः शेतकऱ्यांचे उत्पन्न हंगामी स्वरूपाचे असल्यामुळे त्यांच्या कर्जाची परतफेडही हंगामावर अवलंबून असते. अशावेळी तातडीची आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी सोने गहाण ठेवून मिळणारे कर्ज मोठा आधार ठरते.
सरकारकडून शेतकरी आणि MSME क्षेत्रासाठी विशिष्ट कर्जवाटपाचे लक्ष्य निश्चित केले जाते. नव्या नियमानुसार गोल्ड लोन सहज आणि वेगाने वितरित करता येणार असल्यामुळे बँकांना ही उद्दिष्टं गाठणं अधिक सोपं होणार आहे.
कर्ज प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होणार.
कर्ज मिळवण्याचे पर्याय वाढणार.
शेतकऱ्यांना हंगामी गरजा पूर्ण करण्यासाठी लगेच निधी उपलब्ध.
बँकांसाठी कमी जोखमीची कर्जपद्धती.
दरम्यान, RBI च्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील कर्जप्रक्रिया अधिक सुलभ, सुरक्षित आणि विश्वासार्ह होणार आहे. शेतकरी, महिला बचतगट, छोटे व्यापारी यांना यातून तात्काळ लाभ मिळण्याची शक्यता असून, हा निर्णय ग्रामीण भारतासाठी आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरतोय.
Mumbai,Maharashtra
July 15, 2025 10:58 AM IST