Last Updated:
PM Kisan 20th Installment Date : देशभरातील कोट्यवधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेच्या 20 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
मुंबई : देशभरातील कोट्यवधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेच्या 20 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकारकडून या योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे. याआधीचा 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये वितरित करण्यात आला होता.
PM KISAN योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही आवश्यक बाबींची पूर्तता करणे गरजेचे आहे. या टप्प्यावर जर एखादी गोष्ट राहिली, तर हप्ता अडू शकतो. खाली दिलेली कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. जसे कि,
बँक खाते आणि आधार तपशील अपडेट असणे.लाभार्थी यादीत नाव असणे. जर यापैकी कोणतीही बाब अर्धवट राहिली असेल, तर शेतकऱ्यांना लाभ मिळण्यात अडथळा येऊ शकतो.
https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. “शेतकरी कोपरा (Farmer’s Corner)” या विभागात “लाभार्थी यादी (Beneficiary List)” पर्याय निवडा. राज्य, जिल्हा, तालुका व गाव यांची माहिती भरून “यादी मिळवा” वर क्लिक करा. तुमचं नाव यादीत दिसल्यास तुम्हाला हप्ता मिळण्याची खात्री आहे.
“Self Registered Farmer/CSC Farmer Status” पर्यायावर क्लिक करा.
आधार क्रमांक व कॅप्चा भरून सबमिट केल्यावर तुमची नोंदणी व मंजुरीची स्थिती दिसेल.
OTP आधारित e-KYC : जर तुमचा आधार मोबाईलशी लिंक असेल, तर pmkisan.gov.in वरून सहज करता येते.
बायोमेट्रिक e-KYC : जवळच्या CSC केंद्रात जाऊन करता येते.
जर आधार व बँक तपशील जुळत नसतील, मोबाईल नंबर चुकीचा असेल, किंवा e-KYC प्रक्रिया पूर्ण झाली नसेल, तर जिल्हा संपर्क अधिकारी (POC) ची माहिती pmkisan.gov.in वरून घेऊन संपर्क साधावा.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 20 वा हप्ता 18 जुलै 2025 रोजी किंवा त्यानंतरच्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. अशी चर्चा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतिहारी येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात या हप्त्याची अधिकृत घोषणा करू शकतात. मात्र, सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
Mumbai,Maharashtra
July 16, 2025 11:58 AM IST