Last Updated:
‘ऑपरेशन सिंदूर’च्या चर्चेदरम्यान, आग्रा येथील शेतकरी रामधनुष त्यागी यांनी सिंदूर शेतीत क्रांती घडवली आहे. महाराष्ट्रातून आणलेल्या एका रोपातून त्यांनी सुमारे 1 किलो बियाणे मिळवले, ज्याचा बाजारभाव…
‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाची सध्या देशभरात जोरदार चर्चा आहे. याच निमित्ताने आग्रा जिल्ह्यातील बाह ब्लॉकमधील वैरी नावाचं एक छोटंसं गावही चर्चेत आलं आहे. या गावातील शेतकरी रामधनुष त्यागी यांनी सिंदूर वनस्पतीची लागवड करून शेतकऱ्यांसाठी एक नवा मार्ग दाखवला आहे.
बाजारातील भाव 10000 रुपये किलो
जवळपास दोन वर्षांपूर्वी रामधनुष यांनी महाराष्ट्रातून 180 रुपये प्रति रोप या दराने सिंदूरची तीन रोपं आणली होती. दुर्दैवाने, त्यापैकी दोन रोपं जगली नाहीत, पण एक रोप मात्र तग धरून राहिलं. याच एका रोपातून त्यांना जवळपास 1 किलो सिंदूरचे बियाणे मिळाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या बियाण्यांचा बाजारातील भाव 10000 रुपये प्रति किलो आहे!
औषधी गुणधर्मांनीदेखील परिपूर्ण
रामधनुष सांगतात की, सिंदूरच्या रोपांची लागवड करण्यासाठी जानेवारी-फेब्रुवारी महिना सर्वात योग्य असतो. ऑक्टोबरपर्यंत या रोपांना शेंदरी रंगाची फळे येतात आणि एप्रिलपर्यंत बियाणे काढणीसाठी तयार होतात. याच बियाण्यांपासून पारंपरिक सिंदूर बनवला जातो, जो औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतो.
सिंदूर वनस्पतीने मिळालं यश
या वनस्पतीला ‘रक्त पुष्प’ असेही म्हणतात. विशेष म्हणजे, कमी खर्च आणि कमी जागेत चांगला नफा देणारं हे पीक मानलं जातं. आता रामधनुष यांच्या या यशामुळे गावातील इतर शेतकरीही सिंदूर शेतीकडे आकर्षित होत आहेत. रामधनुष त्यांना योग्य सल्ला आणि माहिती देऊन मदत करत आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशभरात हे नाव गाजत असताना, शेतकरी रामधनुष यांचा हा प्रयत्न आत्मनिर्भर आणि स्वदेशी यशाचं उत्तम उदाहरण बनत आहे.
Mumbai,Maharashtra
June 09, 2025 11:46 AM IST
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर चर्चेत आला ‘हा’ शेतकरी, केली ‘सिंदूर’ शेती; ₹10,000 प्रति किलो मिळाला भाव!