Last Updated:
Agriculture News : खरीप हंगाम 2025 साठी कृषी विभागामार्फत विविध योजनांअंतर्गत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर शेतकऱ्यांची निवड प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
मुंबई : खरीप हंगाम 2025 साठी कृषी विभागामार्फत विविध योजनांअंतर्गत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर शेतकऱ्यांची निवड प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नाशिक विभागातील 20,170 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना 145.62 कोटी रुपयांचा थेट लाभ मिळणार आहे.
नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवड झालेल्या शेतकऱ्यांनी 31 मे 2025 पर्यंत आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी (Maha DBT) पोर्टलवर सादर करावीत, अन्यथा त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल.
विविध योजनांमध्ये लाभार्थींची निवड
21 मे रोजी झालेल्या राज्यस्तरीय खरीप नियोजन बैठकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या नव्या पद्धतीस मान्यता देण्यात आली. त्यानुसार नाशिक विभागात खालीलप्रमाणे शेतकऱ्यांची निवड झाली आहे
वैयक्तिक शेततळे योजना – 1,639 शेतकरी
सूक्ष्म सिंचन योजना – 11,734 शेतकरी
सामूहिक शेततळे व प्लास्टिक अस्तरीकरण – 142 शेतकरी
फलोत्पादन घटक – 1,044 शेतकरी
कृषी यांत्रिकीकरण योजना – 301 शेतकरी
कृषी यांत्रिकीकरण उपअभियान – 3,783 शेतकरी
माहितीची उपलब्धता आणि पुढील प्रक्रिया
लाभार्थ्यांची यादी महाडीबीटी पोर्टल, कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर, तसेच क्षेत्रीय कृषी अधिकाऱ्यांच्या लॉगिनवर पाहता येईल. निवड झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचनाही पाठवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी त्यांचा Farmer ID वापरून माहिती पडताळावी. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही, त्यांनी जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात जाऊन तो मिळवावा. योग्य कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना त्वरित अंतिम मंजुरी दिली जाईल.
Mumbai,Maharashtra
May 28, 2025 11:49 AM IST
गुड न्यूज! कृषी विभागाकडून या शेतकऱ्यांना मिळणार 145 कोटी रुपये, वाचा सविस्तर