Last Updated:
Rose Farming: सोलापूरच्या शेतकऱ्याने काश्मिरी गुलाबाची शेती केलीये. एकदा लागवड केली की 2 वर्षे यातून रोज पैसे मिळतात.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील शेतकरी अनंत भालचंद्र मेटकरी यांनी अडीच फूट अंतरावर दहा गुंठ्यात काश्मिरी गुलाबाची लागवड केली आहे. अनंत मेटकरी यांनी आंतरपीक म्हणून काश्मिरी गुलाबाची लागवड केली आहे. दहा गुंठ्यात कश्मीर गुलाबाची लागवड करण्यासाठी मेटकरी यांना 10 हजार रुपये पर्यंतचा खर्च आला आहे.
लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात काश्मिरी गुलाबाची मागणी बाजारात अधिक आहे. काश्मिरी गुलाबाला सध्या बाजारात एक हजार रुपये ते दीड हजार रुपये भाव मिळत आहे. एकदा काश्मिरी गुलाबाची लागवड केल्यावर त्यापासून 2 वर्षांपर्यंत उत्पन्न मिळते. तर दररोज शेतकरी अनंत मेटकरी यांना दोन ते तीन हजार रुपये काश्मिरी गुलाबाच्या विक्रीतून मिळत आहे.
शेतकरी अनंत मेटकरी यांनी दोन एकरात प्रामुख्याने मोहगणी या झाडांची लागवड केली आहे. मोहगणीपासून शेतकरी मेटकरी यांना दहा वर्षानंतर उत्पन्न मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी आंतरपीक म्हणून काश्मिरी गुलाबाची लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी आंतरपीक म्हणून या काश्मिरी गुलाबाची लागवड केली, तर त्यापासून दररोज उत्पन्न मिळते आणि आपला खर्च भागतो, असा सल्ला शेतकरी मेटकरी यांनी दिला आहे.
Solapur,Maharashtra
ताजा पैसा! सोलापूरच्या शेतकऱ्याची गुलाबी शेती, एकदा लागवड अन् 2 वर्षे नो टेन्शन!