2025-26 वर्षासाठी खालील योजनांसाठी लाभार्थी निवड केली जाणार आहे:
दुधाळ गायी-म्हशींचे गट वाटप
शेळी-मेंढी गट वाटप
मांसल कुक्कुट संगोपनासाठी निवारा शेडसाठी अर्थसाहाय्य
100 कुक्कुट पिलांचे वाटप
25+3 तलंगा गट वाटप
अर्ज प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक
अर्ज भरण्याची मुदत: 3 मे ते 2 जून
रँडमायझेशन पद्धतीने प्राथमिक लाभार्थी निवड: 3 ते 7 जून
मागील व चालू वर्षातील लाभार्थ्यांकडून कागदपत्रे अपलोड: 8 ते 15 जून
पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे पडताळणी: 16 ते 24 जून
कागदपत्रातील त्रुटी दुरुस्तीची मुदत: 25 ते 27 जून
कागदपत्रांची अंतिम पडताळणी: 28 ते 30 जून
अंतिम पात्र लाभार्थी यादी जाहीर: 2 जुलै
अर्ज करताना अर्जदाराने दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन किंवा शेळीपालन या योजनांपैकी कोणतीही एक योजना स्वतंत्रपणे निवडता येईल. अर्ज करताना नमूद मोबाईल क्रमांक अपरिवर्तित ठेवणे अत्यावश्यक आहे, कारण याच क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबतचे संदेश पाठवले जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व इतर माहिती संकेतस्थळावर व अॅपवर उपलब्ध आहे.
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी सांगितले की, अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ असून, मोबाईलचा वापर करून अर्ज करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी 1962 किंवा 1800-233-0418 या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, उपआयुक्त कार्यालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा.
या योजनांसाठी एकदाच अर्ज केल्यानंतर दरवर्षी पुन्हा अर्ज करण्याची गरज नसावी म्हणून प्रतीक्षा यादी प्रणाली लागू करण्यात आली असून, ती 2021-22 पासून 2025-26 पर्यंत वैध राहील. यामुळे अर्जदारांना लाभ मिळण्याची शक्यता अधिक असून, प्रतीक्षा क्रमांकानुसार अंदाजे लाभ मिळण्याची वेळ समजण्यास मदत होईल. अशी माहिती डॉ.प्रवीणकुमार देवरे, पशुसंवर्धन आयुक्त,पुणे यांनी दिली आहे.
Mumbai,Maharashtra
पशूसंवर्धन विभागाकडून योजना राबवण्यास सूरवात! वेळापत्रक,अर्जप्रक्रिया जाणून घ्या एका क्लिकवर