By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: कॅन्सर झालेल्या बैलाचे शिंग काढले अन् प्राण वाचले, सोलापुरातील घटना, Video
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > कॅन्सर झालेल्या बैलाचे शिंग काढले अन् प्राण वाचले, सोलापुरातील घटना, Video
टॉप स्टोरीज़

कॅन्सर झालेल्या बैलाचे शिंग काढले अन् प्राण वाचले, सोलापुरातील घटना, Video

News Desk
Last updated: 2025/05/08 at 3:24 PM
News Desk
Share
3 Min Read

Contents
शेतकरी राजा आणि बैल यांचं अतूट नातं आपण आज पाहणार आहोत. बैलाला कॅन्सर झाल्याचे निदर्शनास आल्याने लगेच ऑपरेशन करण्याचा निर्णय घेत चार तास ऑपरेशन करत शिंग कापून काढले. यामुळे बैलाचे प्राण वाचले.देव तारी त्याला कोण मारी ! शिंग काढले अन् बैलाचे प्राण वाचले;पहा शेतकरी आणि बैला

Last Updated:April 14, 2025 5:38 PM IST

शेतकरी राजा आणि बैल यांचं अतूट नातं आपण आज पाहणार आहोत. बैलाला कॅन्सर झाल्याचे निदर्शनास आल्याने लगेच ऑपरेशन करण्याचा निर्णय घेत चार तास ऑपरेशन करत शिंग कापून काढले. यामुळे बैलाचे प्राण वाचले.

X

देव तारी त्याला कोण मारी ! शिंग काढले अन् बैलाचे प्राण वाचले;पहा शेतकरी आणि बैला

सोलापूर :- वाद-विवादामुळे माणसाला नातं फार काळ टिकवता येत नाही. बोलता येत असताना सुद्धा नातं टिकवायला तो अपयशी ठरतो. मात्र, शेतकरी राजा आणि बैल यांचं अतूट नातं आपण आज पाहणार आहोत. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी या गावात राहणाऱ्या सिद्धाराम भोसले यांच्या बैलाच्या शिंगातून पू येणे, शिंग हलणे असा त्रास होत होता. या बाबत ॲनिमल राहतच्या डॉक्टरांना याची माहिती दिली. त्यात बैलाला कॅन्सर झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी लगेच ऑपरेशन करण्याचा निर्णय घेत चार तास ऑपरेशन करत शिंग कापून काढले. यामुळे बैलाचे प्राण वाचले.

उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी या गावात राहणारे सिद्धाराम भोसले यांच्याकडे एकच बैल आहे. तो बैल वृद्ध झाल्याने त्याला शेतकामाला जुंपत नव्हते. पण त्यांच्या आरोग्याची काळजी नेहमी सिद्धाराम भोसले हे घेत होते. बैलाला अनेक दिवसांपासून वैरण खाता येत नव्हती, बैलाची शिंगे खाली वाकली होती, शिंगातून रक्त येत होते, शिंगातून पू येत होता, वास येत होता. त्या बैलाचा त्रास पाहावेसा न झाल्याने याबाबतची माहिती भोसले यांनी ॲनिमल राहत या संस्थेला दिली. माहिती मिळताच अजित मोठे यांनी पाहणी केली. 

घटनेचे गांभीर्य पाहून त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश जाधव यांच्याबरोबर संपूर्ण बैलाची आणि शिंगाची पाहणी केली. डॉ.जाधव यांनी क्षणाचा विलंब न करता सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गुरुवार 10 एप्रिल रोजी चार तास सर्जरी करीत शिंग कापून काढले. यासाठी डॉ. आकाश जाधव, भीमा शंकर, गणेश जावीर आणि बैल मालक भोसले यांनी परिश्रम घेतले. ॲनिमल राहत या संस्थेकडून या बैलाचे ऑपरेशन मोफत करण्यात आले आहे. ऑपरेशन झाल्यावर बैल मालक सिद्धाराम भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले.

अशी घ्या बैलांची काळजी घ्या  

बैलाच्या मालकांनी शिंगे तासू नये, शिंगाला कलर लावू नये. यामुळे बैलाच्या होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करा, तंदुरुस्त आणि सुरक्षित ठेवा आणि कॅन्सरपासून बचाव करा, असे आवाहन ॲनिमल राहतचे डॉ. आकाश जाधव यांनी केले. तसेच कोणताही जनावरास इजा झाल्यास किंवा जखमी झाल्यास अवस्थेत दिसल्यास तात्काळ राहत ॲनिमलचे संपर्क साधावे असे आवाहन डॉ.आकाश जाधव यांनी केले आहे.

Location :

Solapur,Maharashtra

First Published :

April 14, 2025 5:38 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

देव तारी त्याला कोण मारी! कॅन्सर झालेल्या बैलाचे शिंग काढले अन् प्राण वाचले, सोलापुरातील घटना, Video

TAGGED: agriculture, anik story, bulls horn removed, Bulls life saved, bulls life saved Solapur, Solapur, कृषी, बैलाचे प्राण वाचले, बैलाचे प्राण वाचले सोलापूर, बैलाचे शिंग काढले, सोलापूर
Previous Article शेतकऱ्याची कमाल! आधुनिक पद्धत्तीने शेतात घेतलं 'हे' पिक, आता होतोय लाखोंचा फायदा
Next Article सह-लिव्हिंगचा नवीन युग: बाजार 5 वर्षांत 5 वेळा वाढेल, मागणी 91 लाख बेडपर्यंत पोहोचेल; प्रत्येक तरुण स्वस्त -प्रवेशयोग्य घरे शोधत आहे – सीओ लिव्हिंगचा नवीन युग 5 वर्षात 5 वेळा वाढेल बाजारपेठेतील मागणी प्रत्येक तरुण स्वस्त प्रवेशयोग्य घरे शोधत असलेल्या 91 लाख बेड आणेल
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : पशूपालनासंदर्भात राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय! शेतकऱ्यांना होणार हा मोठा फायदा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
ऊस शेतीला शोधला पर्याय, कोल्हापूरच्या पाटील बंधूंनी केली ड्रॅगन शेती, लाखोंचा नफा
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांना बियाणे, खतांविषयी अडचणी असल्यास कृषी विभागाकडे कशी तक्रार करायची?
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?