Last Updated:
छत्रपती संभाजीनगरमधील वरझडी शिवारातील प्रगतशील शेतकरी काकासाहेब पठाडे यांनी सफरचंदाची यशस्वी शेती केली आहे. या नावीन्यपूर्ण प्रयोगाचे कृषी विभागासह, शेतकऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर : शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील वरझडी शिवारातील प्रगतशील शेतकरी काकासाहेब पठाडे यांनी सफरचंदाची यशस्वी शेती केली आहे. या नावीन्यपूर्ण प्रयोगाचे कृषी विभागासह, शेतकऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. यामधून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळणार आहे.
शेतकरी काकासाहेब पठाडे यांनी आपल्या शेतात विकसित हरमन – 99 या वाणाची लागवड केली असून दीड एकरमधील ही फळबाग सध्या तीन वर्षांची आहे. या झाडांना छोट्या आकाराची फळे ही मोठ्या प्रमाणात लागल्याने या प्रयोगाची छत्रपती संभाजीनगरसह जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे.
जम्मू–काश्मीर सफरचंदाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पण पठाडे यांनी मराठवाड्यासारख्या भागात हे फळपीक फुलवून दाखवले आहे. सफरचंद हे मोसंबी, डाळिंब, द्राक्षांपेक्षा कमी खर्चाचे फळपीक आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या फळाची लागवड केली पाहिजे. तसेच आमच्याकडे सुमारे 35 एकर शेतजमीन असून दीड एकर शेतीत प्रायोगिक तत्त्वावर 9 बाय 13 च्या अंतरावर सफरचंदाची लागवड केली आहे.
डिसेंबर जानेवारी महिन्यात ही लागवड करण्यात आली होती. आता सध्या तीन वर्षांची झाडे असून त्यांची निगा राखण्यासाठी शेणखतासह काही प्रमाणात मिश्र खतांची मात्रा देण्यात येते. या फळांची साधारणत जून, जुलैमध्ये काढणी करावी लागणार आहे, असं काकासाहेब पठाडे यांनी सांगितले.
सध्या झाडांना मोठ्या प्रमाणात फळे लागली असून जवळपास 2 ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न निघण्याची शक्यता पठाडे यांनी वर्तवली आहे. मराठवाड्यातील हवामानात सफरचंदाची लागवड शक्य असल्याचे या प्रयोगातून स्पष्ट झाले असून, हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.
Aurangabad,Maharashtra
May 17, 2025 12:46 PM IST
Apple Cultivation : रिस्क घेतली अन् पैसे आला! पाणी कमी असलेल्या मराठवाड्यात केली लाल चुटूक सफरचंदाची शेती