काय आहे प्रतिकूल ताबा?
1963 च्या मर्यादा कायद्यानुसार, जर एखादा भाडेकरू मालमत्तेत सलग 12 वर्षे राहतो आणि त्या कालावधीत मालकाने मालकी हक्कासाठी कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही, तर भाडेकरू त्या मालमत्तेवर प्रतिकूल ताब्याद्वारे मालकी हक्क सांगू शकतो. म्हणजेच मालकाने आपला हक्क गमावल्यासारखा समजला जातो, आणि भाडेकरू ताब्याचा आधार घेत मालकी मिळवू शकतो.
भाडेपट्टा संपल्यानंतर धोका वाढतो
भाडेकरूंचा भाडेपट्टा संपला तरीही ते तिथे राहून गेले, आणि मालकाने त्यांच्यावर कारवाई केली नाही, तर प्रतिकूल ताबा लागू होतो. विशेषतः जर घरमालकाने भाडेकराराचे उल्लंघन होऊनही दुर्लक्ष केले, तर भविष्यात मालकी हक्क गमावण्याची शक्यता असते.
सरकारी मालमत्तेवरही लागू होतो नियम
हे नियम फक्त खाजगी नव्हे तर सरकारी मालमत्तेसाठीही लागू होतात.
खाजगी मालमत्तेसाठी 12 वर्षांचा ताबा असणे आवश्यक
सरकारी मालमत्तेसाठी 30 वर्षांचा सततचा ताबा लागतो.
म्हणजेच, जर कोणी एखाद्या सरकारी जागेत सलग 30 वर्षे राहत असेल, तर त्याला त्या मालमत्तेवर कायदेशीर दावा करता येतो.
घरमालकांनी काय काळजी घ्यावी?
भाडेकरार लेखी स्वरूपात आणि स्पष्ट अटींसह असावा. भाडेपट्टा कालावधी संपताच तो नूतनीकरण करावा किंवा भाडेकरूला बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करावी. मालमत्तेवर नियमितपणे मालकी हक्क प्रस्थापित करणारी कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत. जर भाडेकरू अटींचे उल्लंघन करत असेल, तर तत्काळ कायदेशीर सल्ला घ्यावा.
दरम्यान, भाडेकरूंना मालमत्ता भाड्याने देणे आर्थिक दृष्टिकोनातून फायदेशीर असले, तरी यात कायदेशीर धोकेही असतात. त्यामुळे मालमत्ता भाड्याने देताना विधी सल्लागाराचा सल्ला घेऊन करार तयार करणे आणि वेळोवेळी मालकीचे अधिकार प्रस्थापित करणे आवश्यक आहे, अन्यथा प्रतिकूल ताब्यामुळे आपली मालमत्ता गमवावी लागण्याचा धोका संभवतो.
Mumbai,Maharashtra
सावधान! तुमची एक चूक अन् भाडेकरूने जमीन, मालमत्तेवर ताबा घेतलाच म्हणून समजा