आई-वडिलांच्या संपत्तीत मुलीचा हक्क काय आहे?
हिंदू उत्तराधिकारी कायद्यात 2005 मध्ये सुधारणा झाली.या सुधारणेनुसार आता विवाहित मुलींना सुद्धा वडीलोपार्जित मालमत्तेत मुलांइतकाच हक्क आहे. 2005 पूर्वी लग्न झालेल्या मुलींना याआधी वडिलांच्या मालमत्तेत अधिकार नव्हता. परंतु सुधारणा लागू झाल्यानंतर लग्न झाले असले तरीही मुलींना वडिलोपार्जित संपत्तीतील समान हक्क मिळतो.
जर संपत्ती आई-वडिलांनी स्वतः कमावलेली (स्वतःची संपत्ती) असेल, तर त्यांनी ती इच्छेनुसार कोणालाही देण्याचा पूर्ण अधिकार आहे. मग ती मुलगी असो, किंवा मुलगा.
या प्रकरणात वडीलांनी संपत्ती मुलीच्या नावावर केली असेल, तर भावाला कोणताही कायदेशीर आक्षेप घेता येत नाही.
भावाच्या संपत्तीवर बहिणीचा हक्क आहे का?
सामान्यतः भावाच्या संपत्तीवर बहिणीला थेट अधिकार नसतो. मात्र काही विशिष्ट परिस्थितीत बहिणीला संपत्तीचा हक्क मिळू शकतो.
हक्क मिळण्याची अट
भावाचा मृत्यू ‘इच्छापत्र’ (Will) न करता झाला असेल.
भावाला पत्नी, मूलगा, मुलगी (वर्ग-1 वारसदार) कोणीच अस्तित्वात नसेल.
या परिस्थितीत बहिण ‘वर्ग-2 वारसदार’ म्हणून भावाच्या संपत्तीवर हक्क सांगू शकते.
तथापि, जर भावाने इच्छापत्राद्वारे संपत्ती इतर कोणालाही दिली असेल, तर बहिणीचा दावा अमान्य होऊ शकतो.
दरम्यान, भावाच्या हयातीत किंवा त्याच्या कुटुंबीयांपैकी कोणी अस्तित्वात असेल तर बहिणीला हक्क मिळत नाही.संपत्ती ‘वडिलोपार्जित’ आहे की स्वतः कमावलेली यावर हक्क ठरतो. इच्छापत्र असणे किंवा नसणे हा निर्णायक मुद्दा ठरतो.
Mumbai,Maharashtra
June 01, 2025 10:05 AM IST