Last Updated:
Agriculture News : खरीप हंगाम 2025 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून 100 टक्के अनुदानावर बियाणे वाटप सुरू आहे. योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 मे 2025 होती.
मुंबई : खरीप हंगाम 2025 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून 100 टक्के अनुदानावर बियाणे वाटप सुरू आहे. योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 मे 2025 होती, मात्र शेतकऱ्यांच्या प्रतिसादामुळे योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता शेतकरी 2 जून 2025 पर्यंत “महाडीबीटी शेतकरी योजना” पोर्टलवर अर्ज करू शकतील.
काय आहे योजना?
ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येते. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना शासकीय प्रमाणित बियाणे मोफत म्हणजेच 100% अनुदानावर – वितरित केले जाते. सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, भात यासारख्या पिकांचे बियाणे या योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत.
प्रक्रिया कशी आहे?
सोडत ही ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर आधारित आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्याच नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर निवडीचा संदेश प्राप्त होईल. केवळ निवड झालेल्या लाभार्थ्यांनाच अनुदानित बियाणे वितरित केले जाईल.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
अर्ज करताना आधार क्रमांक, सातबारा उतारा, लागवडीचा तपशील ही कागदपत्रे तयार ठेवा.
पोर्टलवर नोंदणी नसल्यास प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. एकाच शेतकऱ्याने एकदाच अर्ज करावा, अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो.
अर्ज कसा व केव्हा करायचा?
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत: 2 जून 2025
बियाणे सोडत कालावधी: 3 ते 5 जून 2025
अर्ज https://mahadbt.maharashtra.gov.in/ या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल.
Mumbai,Maharashtra
June 01, 2025 3:19 PM IST
कृषी विभागाकडून 100% अनुदानावर बियाणांचे वाटप! अर्ज कुठे करायचा? वाचा सविस्तर