By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: पीएम किसानच्या 20 व्या हप्त्यासाठी नवीन अट! हे डॉक्युमेंट नसल्यास शेतकऱ्यांना मिळणार नाही 2,000 रुपये
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > पीएम किसानच्या 20 व्या हप्त्यासाठी नवीन अट! हे डॉक्युमेंट नसल्यास शेतकऱ्यांना मिळणार नाही 2,000 रुपये
टॉप स्टोरीज़

पीएम किसानच्या 20 व्या हप्त्यासाठी नवीन अट! हे डॉक्युमेंट नसल्यास शेतकऱ्यांना मिळणार नाही 2,000 रुपये

News Desk
Last updated: 2025/05/04 at 9:05 AM
News Desk
Share
3 Min Read

Last Updated:May 04, 2025 2:12 PM IST

PM Kisan Yojana : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ (PM-KISAN) योजना आता अधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या योजनेचा 20 वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

News18

मुंबई : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ (PM-KISAN) योजना आता अधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या योजनेचा 20 वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र यावेळी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, फक्त ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) असलेल्या शेतकऱ्यांनाच हा हप्ता मिळणार आहे.

काय आहे फार्मर आयडी?

फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्याची ओळख पटवणारा एक विशिष्ट क्रमांक, जो डिजिटल स्वरूपात तयार केला जातो. सरकार शेतकऱ्यांची माहिती एका केंद्रीकृत डेटाबेसमध्ये संकलित करत आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक आयडी दिला जातो. या आयडीमध्ये शेतकऱ्याचे नाव, आधार क्रमांक, शेतीचे क्षेत्रफळ, पीक पद्धती, बँक खाती आणि इतर माहिती समाविष्ट असते.

का घेतला निर्णय?

सरकारच्या माहितीनुसार, आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये अनेक अपात्र व्यक्तींचा समावेश झाल्याचे उघड झाले आहे. यात शेतजमीन नसलेले, करदाते, संस्थात्मक जमीनधारक, सरकारी कर्मचारी यांचा समावेश होता. यामुळे योजनेचा योग्य लाभ खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नव्हता. आता ‘फार्मर आयडी’च्या अटीनंतर, अपात्र व्यक्ती या योजनेपासून आपोआप वगळल्या जातील,आणि खरे लाभार्थीच यात सहभागी राहतील.

20 वा हप्ता केव्हा मिळणार?

योजनेचा 20 वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. नेहमीप्रमाणे, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रु थेट जमा होणार आहेत. पण यावेळी फक्त फार्मर आयडी लिंक केलेल्या खात्यांनाच पैसे मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली माहिती पीएम किसान पोर्टलवर अद्ययावत करावी, आणि फार्मर आयडी जनरेट केला आहे का याची खात्री करावी.

दरम्यान, पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता आता केवळ पात्र, फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली माहिती वेळेत अपडेट करून ठेवणं आवश्यक आहे. अन्यथा, यंदाचा हप्ता थांबू शकतो.

Location :

Mumbai,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

पीएम किसानच्या 20 व्या हप्त्यासाठी नवीन अट! हे डॉक्युमेंट नसल्यास मिळणार नाही 2,000 रुपये

TAGGED: agriculture news, farmer, farmer id, farmer id latest update, farmer id news, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : शेतजमीन खरेदी करत असाल तर थांबा! हा नियम वाचा, अन्यथा सरकार जमीन करेल जप्त
Next Article पुढील आठवड्यात नौकरी डॉट कॉमची मूळ कंपनी, तपशील जाणून घ्या – पुढील आठवड्यात शेअर्सचे विभाजन करण्यासाठी माहिती एज पुढील आठवड्यात शेअर्सचे विभाजन करा हे शोधा की शेपर किती चेपर आहे
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
ऊस शेतीला शोधला पर्याय, कोल्हापूरच्या पाटील बंधूंनी केली ड्रॅगन शेती, लाखोंचा नफा
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांना बियाणे, खतांविषयी अडचणी असल्यास कृषी विभागाकडे कशी तक्रार करायची?
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मॉन्सून महाराष्ट्रात येणार
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?