By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: एकदाच लागवड अन् थेट 200% नफा, हे पीक बदलतंय शेतकऱ्यांचे जीवन! वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > एकदाच लागवड अन् थेट 200% नफा, हे पीक बदलतंय शेतकऱ्यांचे जीवन! वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

एकदाच लागवड अन् थेट 200% नफा, हे पीक बदलतंय शेतकऱ्यांचे जीवन! वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/05/02 at 6:22 PM
News Desk
Share
3 Min Read

चिया लागवडीचा योग्य हंगाम कोणता?

रब्बी हंगाम चिया लागवडीसाठी सर्वाधिक योग्य आहे. साधारणपणे 1 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर दरम्यान लागवड करावी. चांगल्या उत्पादनासाठी पुरेसा सूर्यप्रकाश आवश्यक असतो. पावसाळ्यात बियाण्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने खरीप हंगामात लागवड टाळावी.

जमिनीत कशी तयारी करावी?

लागवडीपूर्वी जमिनीतील तण व कचरा साफ करून 8 ते 10 इंच खोल वखरणी करावी. काही शेतकरी शून्य मशागत पद्धतीनेही चिया पेरणी करतात. पाणी नीट वितरित होण्यासाठी शेताचे सपाटीकरण करणे गरजेचे आहे. तसेच कुजलेले सेंद्रिय खत, कंपोस्ट किंवा गांडूळखत मिसळल्यास जमिनीत सुपीकतेचा वाढ होतो. गादी वाफा किंवा सरीवरंबा पद्धतीने लागवड केल्यास चांगला निचरा साधता येतो.

बियाण्याची निवड कशी करावी?

यशस्वी उत्पादनासाठी स्वच्छ, शुद्ध व एकसारखे चिया बियाणे निवडणे अत्यावश्यक आहे. बियाणे विश्वसनीय पुरवठादाराकडून विकत घ्यावे. सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा. स्वतःच्या पिकातून राखलेले बियाणे वापरल्यास उत्पादन खर्चात बचत होते.

उच्च उत्पादक जाती कोणत्या आहेत?

सीएफटीआरआय संस्थेने विकसित केलेल्या ‘चियाम्पियन डब्ल्यू-83’ (पांढऱ्या बिया) आणि ‘चियाम्पियन बी-1’ (काळ्या बिया) या उच्च उत्पादनक्षम जातीलागवडीसाठी उत्कृष्ट ठरतात. प्रति हेक्टर 1.5 ते 2 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा पावडरने बीजप्रक्रिया करावी.

पेरणी कशी करावी?

बारीक मातीत मिसळून 45×30 सेंटीमीटर अंतरावर बियाणे पेरावीत व फक्त 1.5 सेंटीमीटर खोल लावावे. खोल पेरणी टाळावी कारण बियाणे नाजूक असते. काही शेतकरी फेक पद्धतीनेही लागवड करतात, परंतु त्यामुळे तण नियंत्रण कठीण होते.

रोपवाटिका पद्धतीनेही लागवड शक्य आहे. गादी वाफ्यावर 100 ग्रॅम बियाणे पसरवून रोपे तयार करावीत. 21 दिवसांत रोपे तयार होतात आणि त्यानंतर 60×30 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी.

पाणी व खत व्यवस्थापन

फुलधारणा व फळधारणा टप्प्यावर नियमित पाणी देणे आवश्यक आहे. नैसर्गिक खतांचा वापर करून जमिनीची गुणवत्ता राखावी आणि रासायनिक खतांचा वापर शक्यतो टाळावा. योग्य कीड व रोग नियंत्रणासाठी सुरुवातीपासून उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.

कापणी व उत्पादन

चिया पीक साधारणतः 90 ते 120 दिवसांत तयार होते. उत्पादनावर हवामान, जमिनीची सुपीकता आणि वापरलेल्या तंत्रज्ञानाचा परिणाम होतो. योग्य पद्धतीने लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळते.

लागवडीदरम्यान लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या बाबी

प्रमाणित बियाण्यांची निवड

योग्य मशागत व जमिनीची तयारी

योग्य पेरणी अंतर आणि खोली

नियमित सिंचन व खत व्यवस्थापन

तण व रोग नियंत्रण

चिया लागवडीमुळे शेतकऱ्यांना आरोग्यवर्धक उत्पादनासह चांगला आर्थिक लाभ मिळतो. त्यामुळे राज्यभर चिया लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

April 28, 2025 1:38 PM IST

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article भूषण पॉवर अँड स्टीलवर बँका नजर – ​​सर्वोच्च न्यायालयाने भूषण पॉवर स्टीलच्या लिक्विडेशनचे आदेश दिले
Next Article एप्रिलमध्ये भारताच्या उत्पादन क्षेत्रात वाढ झाली, निर्यात आणि रोजगारामध्ये सुधारणा – भारत उत्पादन क्षेत्रात एप्रिलच्या खर्चामध्ये लक्षणीय वाढ दिसून येते आणि रोजगार सुधारतो
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
ऊस शेतीला शोधला पर्याय, कोल्हापूरच्या पाटील बंधूंनी केली ड्रॅगन शेती, लाखोंचा नफा
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांना बियाणे, खतांविषयी अडचणी असल्यास कृषी विभागाकडे कशी तक्रार करायची?
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मॉन्सून महाराष्ट्रात येणार
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?