Last Updated:
Agriculture News : पारंपरिक शेतीच्या चौकटीतून बाहेर पडत आजच्या शेतकरी आधुनिक शेतीकडे वळताना दिसत आहेत. नव्या पद्धती, नव्या पिकांचा अवलंब करत उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशीच एक उच्च नफा देणारी शेती म्हणजे चंदनाची लागवड.
मुंबई : पारंपरिक शेतीच्या चौकटीतून बाहेर पडत आजच्या शेतकरी आधुनिक शेतीकडे वळताना दिसत आहेत. नव्या पद्धती, नव्या पिकांचा अवलंब करत उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशीच एक उच्च नफा देणारी शेती म्हणजे चंदनाची लागवड. चंदनाचे झाड हे केवळ सुगंधासाठी नव्हे तर मोठ्या आर्थिक मूल्यामुळेही महत्त्वाचे मानले जाते. योग्य नियोजन आणि देखभाल केल्यास चंदनाच्या शेतीतून शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा नफा मिळू शकतो.
कर्नाटक आणि तामिळनाडूतील यशस्वी उदाहरणे
देशातील कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांत चंदनाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. येथील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी चंदन लागवडीचा मार्ग स्वीकारून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. चंदनाचे लाकूड बाजारात अत्यंत महाग आहे आणि त्याच्या सुगंधामुळे त्यास विविध औषधी, सुगंधी आणि सौंदर्यप्रसाधनांच्या उद्योगांमध्ये मोठी मागणी आहे.
चंदन लागवडीसाठी योग्य वेळ आणि काळजी
चंदनाची लागवड वर्षभर कधीही करता येते. मात्र, चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी लावलेले रोप किमान दोन वर्षांचे आणि निरोगी असावे. लागवडीच्या वेळी पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल याची खात्री करणे अत्यंत गरजेचे आहे, कारण चंदनाचे झाड पाण्यात साचल्यास मरू शकते. सुरुवातीच्या काही वर्षांत झाडांची विशेष काळजी घ्यावी लागते. नियमित तणनियंत्रण, सिंचन आणि झाडाभोवती मदतनीस झाडांची लागवड उपयुक्त ठरते.
एका एकरातून कोट्यवधींची कमाई
चंदनाच्या एका झाडापासून सरासरी 5 ते 6 लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. एका एकरात सुमारे 600 झाडांची लागवड शक्य असल्यामुळे एकूण उत्पन्न 30 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 12 ते 15 वर्षांचा कालावधी लागतो, पण इतका संयम ठेवला तर चंदन शेती कोट्याधीश बनवू शकते.
जमिनीचा अडथळा नाही
चंदन शेतीसाठी कोणत्याही विशेष प्रकारची जमीन आवश्यक नसते. माळरान, ओसाड, डोंगराळ किंवा थोडी उशिरा पाणी धारण करणारी जमीन चंदन लागवडीसाठी योग्य ठरू शकते. यामुळे पारंपरिक पीक घेता न येणाऱ्या जमिनीचाही उपयोग होतो.
चंदन लागवड ही दीर्घकालीन पण अत्यंत फायदेशीर शेती असून तिच्यासाठी नियोजन, प्रारंभीची गुंतवणूक आणि योग्य व्यवस्थापन गरजेचे आहे. सरकारकडूनही यासाठी परवाने, प्रशिक्षण आणि मदत उपलब्ध आहे. योग्य नियोजन करून चंदन शेती केल्यास पारंपरिक शेतीपेक्षा अनेक पटीने जास्त उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा विचार करणे फायदेशीर ठरू शकते.
Mumbai,Maharashtra