Last Updated:
Agriculture News : पारंपरिक शेतीच्या चौकटीबाहेर पडत आजचा शेतकरी आधुनिकतेचा स्वीकार करत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, नव्या पिकांचे प्रयोग आणि नफ्यावर लक्ष केंद्रित करत शेती व्यवसायात नवे मार्ग शोधले जात आहेत.
मुंबई : पारंपरिक शेतीच्या चौकटीबाहेर पडत आजचा शेतकरी आधुनिकतेचा स्वीकार करत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, नव्या पिकांचे प्रयोग आणि नफ्यावर लक्ष केंद्रित करत शेती व्यवसायात नवे मार्ग शोधले जात आहेत. या नव्या प्रवाहात सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा पर्याय म्हणजे चंदन शेती. उच्च मूल्य असलेल्या चंदन लाकडामुळे ही शेती केवळ सुगंधापुरती मर्यादित न राहता, शेतीतून कोट्यवधींचे उत्पन्न मिळवण्याचा पर्याय बनत आहे.
दक्षिण भारतातील कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये शेकडो शेतकऱ्यांनी चंदन लागवडीतून मोठे यश मिळवले आहे. पारंपरिक पिकांना अलविदा म्हणत त्यांनी चंदन शेतीकडे वळत लाखोंचा नफा कमावला आहे. चंदन लाकडाची किंमत जगभरात अधिक असल्यामुळे याला सौंदर्यप्रसाधने, औषधी उत्पादने व सुगंधी उद्योगांमध्ये मोठी मागणी आहे.
चंदन लागवडीसाठी आवश्यक काळजी आणि नियोजन
लागवडीचा योग्य काळ – वर्षभर कोणत्याही वेळी लागवड शक्य; मात्र, 2 वर्षांहून अधिक वयाचे व निरोगी रोपच वापरावे.
पाण्याचा निचरा – चंदनाचे झाड स्थिर पाण्यामुळे सडते, त्यामुळे जमिनीत चांगला निचरा असणे आवश्यक.
प्रारंभीची निगा – पहिल्या काही वर्षांत तण नियंत्रण, नियमित सिंचन आणि झाडाभोवती मदतीच्या झाडांची लागवड आवश्यक.
एका एकरात 30 कोटींपर्यंत उत्पन्न शक्य!
चंदनाच्या एका परिपूर्ण झाडापासून सरासरी 5 ते 6 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. जर एका एकरात सुमारे 600 झाडे लावली, तर एकूण उत्पन्न 30 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. ही शेती 12 ते 15 वर्षांचा कालावधी घेते, परंतु संयम बाळगल्यास अत्यंत फायदेशीर ठरते.
कोणतीही जमीन लागवडीसाठी योग्य
ही शेती माळरान, ओसाड, डोंगराळ किंवा पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीवरही सहज करता येते. त्यामुळे उपयोग न होणाऱ्या जमिनींचा उपयुक्त वापर करता येतो.
Mumbai,Maharashtra