रिठा म्हणजे काय?
रिठा हे एक औषधी झाड असून त्याच्या फळांत नैसर्गिक सॅपोनीन असते. हे घटक साबण, शॅम्पू, डिटर्जंट, कंडिशनर यांसारख्या उत्पादनांमध्ये वापरले जातात. याशिवाय, रिठ्याचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्ये दमा, सर्दी, अपचन, त्वचारोग आणि विषबाधा यावरही केला जातो. नैसर्गिक आणि रासायन्यमुक्त घटक असलेले हे फळ आज देशांतर्गत व जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात मागणीला आहे.
लागवडीची पद्धत
रिठा झाड 1500 मीटरपर्यंत उंचीच्या भागातही चांगली वाढते.
यासाठी कोरडवाहू आणि मध्यम प्रकारची जमीन उपयुक्त ठरते.
रोपवाटिकेतून रोपे तयार करून लागवड केली जाते.
झाड एकदा रुजल्यावर त्याला अतिरिक्त सिंचन, खते किंवा कीटकनाशकांची गरज नसते.
यामुळे देखभाल खर्च अत्यंत कमी होतो आणि सेंद्रिय शेतीसाठी हे झाड उत्तम पर्याय ठरते.
उत्पन्न व नफा
एका एकरमध्ये सरासरी 100 रिठा झाडे लावता येतात.
एक झाड दरवर्षी 100 किलो फळ देऊ शकते.
सध्या बाजारात रिठ्याचे दर 100 रुपये प्रतिकिलो आहेत.
यानुसार, एका एकरातून 10 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न मिळू शकते.
उत्पादन सुरू होण्यास लागवडीनंतर चार वर्षे लागतात, पण त्यानंतर झाडे २०-२५ वर्षे फलधारणा करतात.विशेष म्हणजे याला खते आणि फवारणीची गरजही भासत नाही.
रिठा शेती ही फक्त नफा देणारीच नाही, तर पर्यावरणास पोषक आणि दीर्घकालीन उत्पन्न देणारी शेती आहे. रासायनिक शेतीमुळे जमिनीचा पोत खराब होत असताना, रिठा झाडे मात्र सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीने वाढतात. त्यामुळे ही शेती हरित शेतीच्या दिशेने एक पाऊल आहे. यासोबतच, रिठ्याची मागणी आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत असल्यामुळे, योग्य मार्केटिंग आणि वितरण व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
तरुण शेतकऱ्यांसाठी संधी
आजच्या काळात प्रयोगशील, पर्यावरणाशी सुसंगत आणि दीर्घकालीन उत्पन्न मिळवून देणाऱ्या शेतीची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर, रिठा शेती हा केवळ पर्याय नाही, तर शेतकऱ्यांसाठी नव्या युगाचा शेतीमधील विश्वासार्ह मार्ग ठरत आहे. योग्य नियोजन, वेळेवर लागवड आणि बाजाराशी थेट संपर्क ठेवल्यास, ही शेती आर्थिकदृष्ट्या समृद्धीचा नवा अध्याय उघडू शकते.
Mumbai,Maharashtra
May 18, 2025 11:00 AM IST