Last Updated:
Agriculture News : पारंपरिक पिकांव्यतिरिक्त आता शेतकरी प्रयोगशील शेतीकडे वळताना दिसत आहेत. वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे नवे पर्याय शोधण्याची वेळ आली आहे.
मुंबई : पारंपरिक पिकांव्यतिरिक्त आता शेतकरी प्रयोगशील शेतीकडे वळताना दिसत आहेत. वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे नवे पर्याय शोधण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत रिठा शेती म्हणजेच सॅपिंडस मुकरोसी (Sapindus mukorossi) या औषधी झाडांची लागवड, शाश्वत उत्पन्न देणारा आणि कमी जोखमीचा पर्याय ठरत आहे.
रिठा म्हणजे काय?
रिठ्याचे झाड हे आयुर्वेदात तसेच सौंदर्यप्रसाधन व नैसर्गिक स्वच्छता उत्पादनांमध्ये अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. याचे फळ हे नैसर्गिक सॅपोनीनयुक्त असून, साबण, शॅम्पू, डिटर्जंट, कंडिशनर यामध्ये वापरले जाते. त्वचेला कोणताही त्रास न देता स्वच्छता करण्याची क्षमता या फळात असते. याशिवाय, दमा, सर्दी, माईग्रेन, अपचन, विषबाधा अशा अनेक पारंपरिक उपचारांत रिठ्याचा वापर होतो. त्यामुळे त्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही मोठी मागणी आहे.
लागवड कशी करावी?
रिठा झाडे 1500 मीटरपर्यंत उंचीवर सहज वाढतात. विशेष बाब म्हणजे ही वनस्पती कोरडवाहू, मध्यम उपजाऊ जमिनीतही सहज उगवते. रिठ्याची रोपवाटिका तयार करून लागवड केली जाते. झाड एकदा रुजले की त्याला जास्त पाणी, खत अथवा कीटकनाशकांची गरज लागत नाही. शून्य रासायनिक शेतीसाठी योग्य असल्याने सेंद्रिय शेतीच्या दृष्टीने आदर्श आहे. यामुळे देखभालीचा खर्च अत्यंत कमी असूनही उत्पन्न मोठे आहे.
उत्पन्न व नफा
एका एकरमध्ये सरासरी 100 झाडांची लागवड शक्य होते. एक झाड दरवर्षी 100 किलोपर्यंत फळ देऊ शकते.
सध्या रिठ्याचा बाजारभाव 100 प्रति किलोच्या घरात आहे. म्हणजेच एका एकरातून दरवर्षी 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. उत्पादन सुरू होण्यास लागवडीनंतर 4 वर्षे लागतात, पण एकदा उत्पादन सुरू झाल्यावर ही झाडे 20-25 वर्षे उत्पन्न देतात, म्हणजेच दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत तयार होतो.
दरम्यान, रिठा शेती ही केवळ पर्यावरणपूरक नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही अत्यंत फायदेशीर आहे. कमी देखभाल, शून्य रासायनिक खर्च, आणि दीर्घकाळ उत्पन्न या प्रमुख बाबी शेतकऱ्यांना आकर्षित करत आहेत. जर योग्य नियोजन आणि मार्केटिंगचा वापर केला. तर रिठा शेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. बदलत्या हवामानाच्या काळात, ही शेती उत्कृष्ट दीर्घकालीन शेतीचा आदर्श ठरू शकते.
Mumbai,Maharashtra
May 12, 2025 11:21 AM IST
एक एकर शेतात लावा 100 झाडी अन् वर्षाला मिळवा 10 लाखापर्यंत उत्पन्न! जाणून घ्या लागवडप्रक्रिया