Last Updated:
Agriculture News : राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत शेतकऱ्यांना गाय, म्हैस, शेळी-बोकड यांचे वाटप करण्यात येत आहे.
मुंबई : राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत शेतकऱ्यांना गाय, म्हैस, शेळी-बोकड यांचे वाटप करण्यात येत आहे. या योजनेसाठी राज्यभरातून पात्र शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, चुकार शेतकऱ्यांना आता कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना मेसेजद्वारे कळवलेली माहिती
ज्या शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत पूर्वीच ऑनलाईन नोंदणी केली होती, त्यांना आता SMS मेसेजद्वारे कागदपत्रे अपलोड करण्याची सूचना पाठवण्यात आली आहे. संबंधित लाभार्थ्यांनी तातडीने https://ah.mahabms.com या अधिकृत पोर्टलवर जाऊन आवश्यक कागदपत्रांची छायाप्रती अपलोड करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
योजनेचा उद्देश काय?
राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे व शेळीपालनासाठी प्रोत्साहन देणे, दुग्ध व्यवसायातून उत्पन्नाचे स्रोत वाढवणे, व शाश्वत पशुसंवर्धन विकसित करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
आवश्यक कागदपत्रांची यादी
ओळखपत्राची छायाप्रती (उदा. आधारकार्ड / मतदार ओळखपत्र),7/12 उतारा (सातबारा)
8 अ उतारा, अपत्य प्रमाणपत्र / स्वत:हून घोषणापत्र, आधारकार्ड, परिस्थितीनुसार आवश्यक कागदपत्रे (लागल्यास अपलोड करावीत), 7/12 वर लाभार्थ्याचे नाव नसल्यास किंवा कुटुंब संमतीपत्र किंवा भाडेकरारनामा, अनुसूचित जाती/जमातीचा दाखला, स्थायी रहिवासी दाखला, बीपीएल प्रमाणपत्र, बँक पासबुकची छायाप्रती, रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र,दिव्यांगत्व प्रमाणपत्र, बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र किंवा गटाच्या बँक पासबुकचे पहिल्या पानाचे छायाचित्र, जन्मतारखेचा पुरावा / वयाचा दाखला,शैक्षणिक पात्रतेचा दाखला, रोजगार / स्वयंरोजगार कार्यालय नोंदणी कार्ड,प्रशिक्षण घेतले असल्यास त्याचा प्रमाणपत्र हे कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
Mumbai,Maharashtra
June 10, 2025 2:58 PM IST
शेळी,बोकड वाटप योजनेसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना येतोय हा मेसेज! वाचा सविस्तर