Last Updated:
Agriculture News : सध्याच्या हवामानात पावसाचे नेमके भाकीत करणे कठीण झाले आहे. यंदा मे महिन्याच्या मध्यातच झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक भागांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मुंबई : सध्याच्या हवामानात पावसाचे नेमके भाकीत करणे कठीण झाले आहे. यंदा मे महिन्याच्या मध्यातच झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक भागांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांना योग्य वेळी पावसाचा अंदाज मिळाला, तर ते शेतीसंबंधी आवश्यक ती खबरदारी घेऊन पिकांचे नुकसान टाळू शकतात.
हवामानाचा अंदाज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आता विविध पर्याय उपलब्ध
आजच्या डिजिटल युगात, शेतकऱ्यांना घरबसल्या हवामानाचा अचूक अंदाज मिळवता येतो. भारतीय हवामान विभाग (IMD), अन्य खासगी कंपन्या आणि विविध मोबाईल अॅप्लिकेशन्सद्वारे हवामानविषयक माहिती सहज उपलब्ध होते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीशी संबंधित योग्य निर्णय घेता येतात आणि आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करता येते.
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त मोबाईल अॅप्स
1) मेघदूत अॅप (Meghdoot App)
भारतीय हवामान विभाग (IMD) आणि उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्थेने (IITM) संयुक्तपणे विकसित केलेले हे अॅप शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.यामध्ये, स्थानिक हवामानाचा साप्ताहिक अंदाज, पीकनिहाय कृषी सल्ला, तापमान, आर्द्रता, वारे, पर्जन्यमान याची माहिती.तसेच शेतकऱ्यांना निर्णय घेण्यास मदत करणारा मार्गदर्शक डेटा असतो. ज्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. हे अॅप Google Play Store वरून मोफत डाउनलोड करता येते.
भारतीय हवामान विभागाची वेबसाइट (IMD Website)
https://mausam.imd.gov.in ही केंद्र सरकारची अधिकृत हवामानविषयक वेबसाइट आहे. यातून जिल्हानिहाय पावसाचा अंदाज, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्टची माहिती. 5 ते 7 दिवसांचा हवामान पूर्वानुमान रडार प्रतिमा,उपग्रह माहिती मिळते.
दरम्यान, आजच्या हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांनी डिजिटल साधनांचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे. हवामानविषयक अॅप्स आणि वेबसाइट्सच्या माध्यमातून वेळेवर सूचना मिळाल्यास, शेतकरी पिकांचे योग्य रक्षण करू शकतात आणि उत्पादनात घट होण्याचा धोका कमी करता येतो.
Mumbai,Maharashtra
June 02, 2025 1:33 PM IST
तुमच्या गावात कधी पाऊस पडणार? या पद्धतीने घरबसल्या बघता येणार हवामान अंदाज