भारतीय कृषि विमा कंपनी, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स, फ्युचर जनरली आणि युनिव्हर्सल सोम्पो या चार प्रमुख विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे.
प्रत्येक फळपिकासाठी अर्जाची अंतिम तारीख वेगवेगळी असून, यासंदर्भात स्थानिक कृषी विभागाकडून माहिती दिली जाईल. परंतु अर्ज करताना ‘Farmer ID’ नसल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
‘Farmer ID’ म्हणजे काय आणि ते का आवश्यक आहे?
‘Farmer ID’ हा शेतकऱ्याचा अधिकृत ओळख क्रमांक आहे, जो कृषी विभागाच्या ‘अॅग्रिस्टॅक’ प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून मिळतो. हा क्रमांक शेतकऱ्यांची शाश्वत ओळख तयार करतो आणि शासकीय योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरला जातो.
राज्यात सध्या जवळपास 1 कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. मात्र अनेक शेतकरी अद्यापही यापासून वंचित आहेत. त्यामुळे सरकारने यावर्षीपासून शेतकऱ्यांसाठी ‘Farmer ID’ अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
खरीप हंगामातही लागेल ओळख क्रमांक
हा नवीन नियम केवळ फळपिक विम्यापुरता मर्यादित नाही. याचप्रमाणे खरीप हंगामातील सर्व पीक विमा योजनांसाठीसुद्धा ‘Farmer ID’ आवश्यक असणार आहे. शेतकऱ्यांकडे जर हा क्रमांक नसेल, तर कोणत्याही प्रकारच्या कृषी योजनांचा लाभ त्यांना मिळणार नाही.
शेतकऱ्यांसाठी सूचना
आपल्या गावाच्या कृषी सहायक अधिकारी, तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून ‘अॅग्रिस्टॅक’ प्रणालीद्वारे नोंदणी करा. नोंदणी केल्यानंतर मिळणारा ‘Farmer ID’ सुरक्षित ठेवा. विमा अर्ज करण्याआधी आपला ID नंबर तपासून खात्री करा.
कृषी विभागाकडून आवाहन
“राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ ‘Farmer ID’ तयार करावा, जेणेकरून फळपिकांसह सर्व कृषी योजनांचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय मिळवता येईल,” असं आवाहन देखील कृषी विभागातर्फे करण्यात आलं आहे.
Mumbai,Maharashtra
June 14, 2025 8:28 AM IST
शेतकऱ्यांसाठी नवीन अट! हे काम केल्याशिवाय खरीप हंगामाचा पीक विमा मिळणार नाही