फार्मर आयडी कसा काढायचा?
शेतकऱ्यांनी पुढील आवश्यक कागदपत्रांसह आपले सरकार सेवा केंद्र (CSC) किंवा सामान्य सेवा केंद्र येथे जाऊन आपला फार्मर आयडी तातडीने तयार करून घ्यावा.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
7/12 उतारा आणि 8-अ खाते उतारा
बँक खात्याचा तपशील
आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक
कृषी विभागाने आवाहन केले आहे की, कोणत्याही योजनांचा लाभ घेण्यासाठी आता फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे.
अॅग्रीस्टॅक उपक्रम म्हणजे काय?
‘अॅग्रीस्टॅक’ ही एक डिजिटल पायाभूत सुविधा प्रणाली आहे, जी डेटा आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृषी योजनांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यास मदत करते. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांचा एकत्रित डिजिटल डेटाबेस तयार होईल. योजनांचे लाभ अचूक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतील.माहितीच्या आधारे निर्णय घेणे सोपे होईल. सेवा वितरणाची कार्यक्षमता वाढेल
फार्मर आयडीशिवाय योजनांना प्रवेश नाही
पूर्वी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी स्वतः लॉगइन आयडी आणि पासवर्ड तयार करून नोंदणी करू शकत होते. मात्र, आता या प्रक्रियेत बदल करण्यात आले असून, फार्मर आयडीशिवाय लॉगइन शक्य नाही. त्यामुळे कोणतीही योजना, अनुदान, अनुदान वितरण, विमा, कर्ज योजना यांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे.
दरम्यान, राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला फार्मर आयडी तयार करून ‘अॅग्रीस्टॅक’ योजनेत नोंदणी करावी, जेणेकरून भविष्यात कोणत्याही शासकीय कृषी योजनेपासून आपण वंचित राहणार नाही.
Mumbai,Maharashtra
महाडीबीटीसंदर्भात शेतकऱ्यांना नवीन अट! हे कागदपत्र अनिवार्य, अन्यथा योजनांचा लाभ मिळणार नाही