जर उर्वरित 20 कोटी जनावरे नियमित दूध देऊ लागली तर देशाच्या दूध उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते. राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत केंद्र सरकारने पाच महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत, ज्यामध्ये कृत्रिम गर्भाधान (AI) आणि लिंग वर्गीकरण वीर्य योजना महत्त्वपूर्ण आहेत. यामधून जनावरांची गुणवत्ता सुधारणे, उत्पादन क्षमता वाढवणे आणि पशुपालकांचे आर्थिक सक्षमीकरण हे उद्दिष्ट आहे. मग आता या चार योजना कोणत्या जाणून घेऊ..
1) कृत्रिम गर्भाधान (AI) योजना –
प्रजनन प्रक्रियेत सुधारणा करून अधिक दूध देणाऱ्या जनावरांची संख्या वाढवणे हे या योजनेचे ध्येय आहे.यामध्ये उच्च गुणवत्तेच्या वीर्याचा वापर करून गायी व म्हशींना कृत्रिमरित्या गर्भधारणा करण्यात मदत केली जाते.पूर्वी ही सेवा मर्यादित होती, मात्र आता AI तंत्रज्ञ थेट पशुपालकांच्या घरी जाऊन सेवा देतात.सरकारने वीर्य केंद्रांचा विस्तार करून त्यांची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला आहे.केंद्रीय देखरेख युनिट (CMU) स्थापन करून वीर्य केंद्रांचे मूल्यांकन आणि वर्गीकरण करण्यात येत आहे.
2) लिंग वर्गीकरण वीर्य योजना –
या योजनेचा उद्देश केवळ मादी वासरांची संख्या वाढवणे आहे, कारण त्या भविष्यात अधिक दूध देऊ शकतात.पूर्वी ही प्रक्रिया अत्यंत महागडी होती, मात्र आता सरकारने गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश येथे सरकारी वीर्य केंद्र सुरू केली आहेत.
तिन्ही खासगी कंपन्या देखील लिंग वर्गीकरण वीर्य उत्पादनात कार्यरत आहेत. आतापर्यंत 1.17 कोटी लिंग वर्गीकृत वीर्य डोस तयार करण्यात आले आहेत.सरकार हे वीर्य स्वस्त दरात उपलब्ध करून देत असल्याने पशुपालकांना मोठा आर्थिक लाभ होत आहे.
3) पीटी बैल योजना –
उच्च दर्जाचे बैल विकसित करण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. गिर,साहिवाल, मुर्रा, मेहसाणा या जातींच्या संतती चाचण्या केल्या जात आहेत. वंशावळ निवडीसाठी राठी, थारपारकर, हरियाणा, कांकरेज आणि जाफराबादी, नीली रवी, पंढरपुरी, बन्नी म्हशींचा समावेश केला आहे.या कार्यक्रमांमुळे दुधाळ जनावरे अधिक उत्पादक आणि दर्जेदार होऊ लागली आहेत.
4) इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) तंत्रज्ञान –
देशी गायींच्या सर्वोत्तम जाती जपण्यासाठी IVF तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
22 नवीन IVF प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत.
पंजाबमध्ये पटियाला आणि लुधियाना येथे नव्या प्रयोगशाळा कार्यरत.
सुधारित प्रजनन प्रक्रियेमुळे दूध उत्पादनात मोठी वाढ होत आहे.
5) जीनोमिक निवड कार्यक्रम –
आनुवंशिक गुणवत्ता तपासून उच्च उत्पादकतेची जनावरे ओळखली जात आहेत.
सरकारने गाऊ चिप (गायींसाठी) आणि महिषा चिप (म्हशींसाठी) विकसित केल्या आहेत.
या तंत्रज्ञानाच्या मदतीने जनावरांचे आनुवंशिक सुधारणा अधिक वेगाने होऊ शकते.
Mumbai,Maharashtra
गाय-म्हशींच्या दूध वाढीसाठी केंद्र सरकार राबवतंय 5 महत्वाच्या योजना, वाचा सविस्तर