Last Updated:
Agriculture News : महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेत मोठ्या प्रमाणात सुधारणा करून राज्यातील युवक-युवतींसाठी नव्या स्वरुपात स्वावलंबनाचा मार्ग खुला केला आहे.
मुंबई : महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेत मोठ्या प्रमाणात सुधारणा करून राज्यातील युवक-युवतींसाठी नव्या स्वरुपात स्वावलंबनाचा मार्ग खुला केला आहे. वाढती बेरोजगारी, तरुणांमधील उद्योगाची इच्छा आणि ग्रामीण भागातील आर्थिक स्थितीचा विचार करून आता ही योजना आणखी व्यापक व प्रभावी करण्यात आली आहे.
आता 1 कोटींपर्यंत कर्ज मिळणार
नवीन सुधारित योजनेनुसार सेवा उद्योग व कृषीपूरक व्यवसायांसाठी 50 लाखांपर्यंत, तर उत्पादन उद्योगांसाठी तब्बल 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होऊ शकते. हे कर्ज अत्यंत सुलभ प्रक्रियेमध्ये आणि कमी अटींमध्ये मिळणार आहे. यासोबतच, शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात (सबसिडी) सुद्धा वाढ करण्यात आली आहे, ज्याचा थेट लाभ व्यवसाय सुरू करणाऱ्या तरुणांना मिळणार आहे.
वयोमर्यादा आणि पात्रता अटी शिथिल
पूर्वी 18 ते 45 वयोगटासाठी असलेली वयोमर्यादा आता 14 वर्षांवरील कोणत्याही स्थानिक युवक-युवतीसाठी खुली करण्यात आली आहे. शिक्षण पात्रतेतही बदल करण्यात आले असून, आता 10 लाखांवरील उत्पादन उद्योगासाठी आणि 5 लाखांवरील सेवा उद्योगासाठी फक्त 8 वी पास असणे पुरेसे आहे.
नवीन व्यवसायांचा समावेश
परंपरागत व्यवसायांच्या जोडीला अनेक नव्या क्षेत्रांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.
कुक्कुटपालन, अंडी उबवणी केंद्र, मधुमक्षिकापालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, हॉटेल-ढाबा,होम स्टे,क्लाऊड किचन जलक्रीडा व प्रवासी बोट सेवा व्यवसाय हे व्यवसाय ग्रामीण व पर्यटन भागांसाठी विशेषतः उपयुक्त ठरणार आहेत.
खेळत्या भांडवलातही वाढ
आता योजनेच्या अंतर्गत सेवा उद्योगासाठी प्रकल्प खर्चाच्या 60% पर्यंत आणि उत्पादन उद्योगासाठी 40% पर्यंत खेळते भांडवल कर्जाच्या माध्यमातून दिले जाईल. त्यामुळे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची चिंता बऱ्यापैकी कमी होणार आहे.
Mumbai,Maharashtra
June 05, 2025 12:47 PM IST
शासनाकडून या योजनेत सुधारणा! नवीन व्यवसायासाठी मिळणार 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज