Last Updated:
Agriculture News : पारंपरिक पिकांच्या तुलनेत जास्त नफा देणारे पर्यायी पीक म्हणून सागाच्या शेतीकडे (Tectona Grandis) शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.
मुंबई : पारंपरिक पिकांच्या तुलनेत जास्त नफा देणारे पर्यायी पीक म्हणून सागाच्या शेतीकडे (Tectona Grandis) शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. एकदा लावले की पुढील 20-25 वर्षे उत्पन्न देणारी साग शेती ही दीर्घकालीन गुंतवणुकीसारखी असून, योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास शेतकरी लाखोंचा नफा मिळवू शकतो.
साग शेती म्हणजे काय?
साग हे बहुपयोगी आणि उच्च दर्जाचे लाकूड असून, फर्निचर, बांधकाम, नौकानिर्मिती, दरवाजे-खिडक्यांसाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याला ‘हिरव्या सोन्या’ची उपमा दिली जाते. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि दक्षिण भारतातील अनेक भागांत सागाची शेती योग्य हवामानात केली जाते.
एक एकरातून लाखोंचा नफा कसा?
एक एकर जमिनीवर सुमारे 400 ते 500 सागाचे रोपे लावता येतात.एका झाडापासून 10–12 वर्षांनंतर सरासरी 10–15 घनफुट लाकूड मिळते.सध्या बाजारात 1 घनफुट साग लाकडाची किंमत 3,000 ते 5,000 पर्यंत आहे.यामुळे एका झाडापासून किमान 30,000 ते 75,000 पर्यंत उत्पन्न शक्य आहे. म्हणजेच एक एकरात योग्य देखभाल केली तर 2 कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.
लागवडीसाठी काय आवश्यक?
साग लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन उपयुक्त ठरते.
मान्सूनपूर्व किंवा नंतरच्या 2–3 महिन्यांत रोपांची लागवड केली जाते.
सुरुवातीचे 2 ते 3 वर्षे तण नियंत्रण, सिंचन आणि खत व्यवस्थापन महत्त्वाचे असते.
शेतीमध्ये ड्रीप इरिगेशन व ऑरगॅनिक खतांचा वापर केल्यास झाडांची वाढ वेगाने होते.
शाश्वत आणि नफा देणारी गुंतवणूक
सागाची लागवड ही दीर्घकालीन असली तरी अनेक खासगी कंपन्या किंवा शेतकरी गट सामूहिक गुंतवणूक करून यामधून चांगला नफा घेत आहेत. काही राज्य सरकारे आणि वनविभागही साग लागवडीसाठी अनुदान आणि तांत्रिक मार्गदर्शन देतात.
Mumbai,Maharashtra
May 28, 2025 10:34 AM IST
पावसाळ्यात शेतामध्ये 500 रोपांची लागवड करा! एकरात घ्याल 2 कोटी रुपयांचे उत्पन्न