कोथिंबीरची लागवड, वेळ आणि तयारी
कोथिंबीर ही एक बहुपयोगी भाजीपाला पीक असून, तिची मागणी वर्षभर असते, पण पावसाळ्यात खासकरून मोठ्या प्रमाणावर वाढते. जून ते ऑगस्ट हा कालावधी कोथिंबीर लागवडीसाठी अतिशय योग्य मानला जातो. यासाठी मध्यम ते हलक्या प्रतीची, पाण्याचा निचरा होणारी जमीन उपयुक्त असते.
लागवडीपूर्वी एकदोन वेळा नांगरट करून जमीन भुसभुशीत करावी लागते. त्यानंतर सेंद्रिय खत, शेणखत, आणि आवश्यक असल्यास निंबोळी खत याचा वापर करून बेड तयार करतात. एक ते दीड किलो बियाणं एका गुंठ्यात पुरेसं होतं.
50 दिवसांत काढणी व विक्री
कोथिंबीरचे पीक सुमारे 45 ते 50 दिवसांत तयार होते. यात सतत निंदणी, पाणी व्यवस्थापन आणि रोग नियंत्रण आवश्यक असते. पावसाळ्यात पाणी देण्याची गरज फारशी लागत नाही, पण अतिरिक्त पावसामुळे मुळे कुजण्याचा धोका असतो. त्यामुळे पाण्याचा निचरा नीट होईल याची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
पीक तयार झाल्यावर थेट मार्केटमध्ये किंवा शेतकरी बाजारांमध्ये विक्री करता येते. कोथिंबीरची किंमत सिझननुसार किलोला 30 रु ते 100 रु पर्यंत पोहोचते. पावसाळ्यात, पुरवठा कमी आणि मागणी अधिक असल्यामुळे दर चांगले मिळतात.
उत्पन्नाचे गणित
एका एकरात साधारणतः 80 ते 100 गुंठे लागवड करता येते. एका गुंठ्यातून सरासरी 25-30 किलो कोथिंबीर मिळते. म्हणजे एका एकरातून सुमारे 2500 ते 3000 किलो उत्पादन मिळू शकते. जर किमान 40 प्रति किलो दर गृहित धरला, तर एकून उत्पन्न 1,00,000 ते 1,20,000 रु पर्यंत जाऊ शकते. जास्त दर मिळाल्यास हे उत्पन्न 2 रु लाखांपर्यंत देखील पोहोचते.
कमी खर्च, जास्त नफा
कोथिंबीर शेतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी इनपुट खर्च. एकरमागे बियाणं, खतं, मजुरी व वाहतूक धरून 20,000 रु ते 25,000 रुपये खर्च येतो. म्हणजेच 50 दिवसांत शेतकरी किमान 75,000 रु ते 1,50,000 पर्यंत नफा कमवू शकतो.
Mumbai,Maharashtra
June 01, 2025 11:18 AM IST
पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी हिरवं सोनं! या पीकातून फक्त 50 दिवसांत लखपती व्हाल, लागवडप्रक्रिया वाचा