योग्य हवामान व जमीन कोणती?
एवोकाडोची शेती समशीतोष्ण ते उष्णकटिबंधीय हवामानात यशस्वी होते. 15°C ते 30°C दरम्यान तापमान असलेल्या भागात उत्पादन चांगले येते. अत्याधिक थंडी आणि धुके यामुळे झाडांचे नुकसान होऊ शकते.
लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची जमीन आवश्यक आहे. मातीचा pH स्तर 5 ते 7 दरम्यान असावा. कमीत कमी 1 मीटर खोली असलेली जमीन या लागवडीसाठी योग्य मानली जाते.
प्रमुख जाती कोणत्या?
Fuerte – उंच उत्पादन क्षमतेची जात, भारतात लोकप्रिय
Hass – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सर्वाधिक मागणीची
Purple Avocado – गडद रंग व वेगळी चव
Green Avocado – जलद तयार होणारी व व्यावसायिक दृष्टिकोनातून उपयुक्त
लागवडीचा योग्य कालावधी
जुलै ते सप्टेंबर दरम्यान रोप लावणीसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. नर्सरीमधून ग्राफ्टेड रोपे घेणे अधिक फायदेशीर ठरते, कारण ती लवकर फळ देतात. रोपांमध्ये 7×7 मीटरचे अंतर ठेवावे. 1 एकरमध्ये 80 ते 100 झाडे सहज लावता येतात.
सिंचन व खत व्यवस्थापन
पहिल्या 2 वर्षांत दर 7-10 दिवसांनी पाणी देणे गरजेचे आहे. त्यानंतर दर महिन्याला 1-2 वेळा सिंचन पुरेसे ठरते. पावसाळ्यात जलनिस्सारणाची चांगली सोय करणे अत्यावश्यक आहे. खतासाठी सेंद्रिय शेणखत, वर्मी कम्पोस्टचा वापर करावा. झाडाच्या वयानुसार दरवर्षी दोन वेळा NPK मिश्रणाचे खत द्यावे.
कीड व रोग व्यवस्थापन
एवोकाडोला फारशा किडी लागत नाहीत. मात्र काही ठिकाणी मुळे सडणे किंवा फंगल इन्फेक्शन होऊ शकते. यासाठी योग्य जलनिस्सारण आणि नीम तेलासारखे जैविक कीटकनाशक फवारणे उपयुक्त ठरते.
फळांचे उत्पादन आणि विक्री
साधारणतः 3-4 वर्षांनंतर झाडे फळ देऊ लागतात. या फळांची खासियत म्हणजे ती झाडावर पक्कत नाहीत; थोडी कच्चीच काढून नंतर 7-10 दिवसात घरच्या घरी मऊ होतात. विक्रीसाठी स्थानिक बाजार, सुपरमार्केट्स, ऑनलाइन प्लॅटफॉर्म तसेच हॉटेल उद्योग हे महत्त्वाचे पर्याय आहेत.
उत्पन्न व संभाव्य नफा
प्रत्येक झाडातून सरासरी 100 ते 150 किलो एवोकाडो मिळू शकतात. बाजारात याचे 150 ते 400 रुपये किलो दराने विक्री होते. यामुळे 1 एकर शेतीतून 3 ते 5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक नफा मिळू शकतो.
Mumbai,Maharashtra
June 08, 2025 1:05 PM IST